Health Tips:  अंडे (Egg) खाण्याचे अनेक फायदे आहेत. अंडी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात  झटपट अशा 'Mug ऑम्लेट'ने करणे फायदेशीर आहे.  ऑम्लेट हा झटपटीत सोपा आणि स्वादिष्ट असा नाश्ता आहे . त्यामुळे तुमचं पोट भरेल आणि तुम्हाला नक्की आवडेल . काही मिनिटांत ही रेसिपी तयार होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही रेसिपी कुणीही बनवू शकतं. त्यामुळे मग ऑम्लेट कसं बनवण्याचे हे सांगणारचं आहे. पण त्याआधी अंडी खाण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊयात.   


अंडी खाण्याचं फायदे काय आहेत? 


अंड्यामध्ये लोह, (Iron)  व्हिटॅमिन ए, (Vitamin A) व्हिटॅमिन डी,(Vitamin D) व्हिटॅमिन ई, (Vitamin E)  व्हिटॅमिन बी 12, (Vitamin B12)   प्रथिने (Protein)  असतात. त्यामुळे तुमच्या शरिराला आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी अंड्यामधून मिळतात. लोहामुळे तुमच्या शरिरातील अशक्तपणा दूर होतो. तर व्हिटॅमिन ए मुळे तुमची त्वचा निरोगी राहते. तुम्हाला केस निरोगी हवे असतील, तर तुम्ही अंड्याचं सेवन करु शकता.  अंड्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.  गरोदर महिलांनी अंड्याचं सेवन केल्यामुळे बाळाची बुद्धी तल्लख होते.  त्याचप्रमाणे अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंड्यांचा आहारातील समावेश उपयुक्त ठरतो. अंड्यातील बलक खाणेही तितकेच गरजेचे असते. मोतीबिंदू आणि रेटीनाच्या समस्या होऊ नये म्हणून अंड्यातील पिवळं बलक खाणं आरोग्यासाठी महत्वाचं असतं . कारण अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये ल्यूटीन आणि झिझेन्थिन ही दोन अँटी ऑक्सिडंटस असतात आणि ते डोळ्यासाठी महत्वाचे असतात.  जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर सकाळी एक आणि दुपारी एक असे अंडं खाल्ले तरी चालेल. पण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या .


'MUG ऑम्लेट'  बनवण्याची कृती 


 'ऑम्लेट' बनवण्यासाठी तुमच्या आवडत्या भाज्या घ्या.चीज स्लाईस, पनीर आवश्कतेनुसार घ्या, आणि अंड घ्या. हे सगळं घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर, सगळ्यात जो मायक्रोवेव्हमध्ये सेफ असेल असा मग (Mug) घ्या. त्या मगला आतून तेल लावा. त्यानंतर अंड त्या मगमध्ये फोडा. चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. आणि अंड चांगल फेटून घ्या. त्यात तुमच्या आवडीच्या भाज्या घाला.  त्याला व्यवस्थित फेटून घ्या. नंतर त्यात पनीर घाला. आणि मायक्रोव्हनमध्ये 1 मिनिटं 30 सेकंद पर्यंत ठेवा. त्यानंतर  'मग ऑम्लेट' बाहेर काढा. त्याच्यावर पनीर, चीज, कोथिंबर घाला.  तयार झालं तुमचं गरमा गरम 'मग ऑम्लेट'. तुम्ही हि रेसिपी नक्की ट्राय करा.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)