Health Tips : सध्या सगळीकडे डेंग्यूच्या (Dengue) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे जो एडिस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यूची लागण झाल्यानंतर ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांध्यांचे दुखणे अशा अनेक समस्या उद्भवतात. अशा वेळी डेंग्यू तापावर कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नसला तरी आहारात सकस आहाराचा समावेश करून हा आजार गंभीर होण्यापासून रोखता येऊ शकतो. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला डेंग्यू झाल्यास काय खावे आणि काय खाऊ नये असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
डेंग्यूच्या आजारात काय खावे?
पपईच्या पानांचा रस
डेंग्यूचा ताप असल्यास पपईच्या पानांचा रस पिणे फायदेशीर मानला जातो. पपईच्या पानांमध्ये chymopapain आणि papain नावाचे एंजाईम असतात, जे रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे डेंग्यूने पीडित व्यक्तीला पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.
नारळ पाणी
डेंग्यू झाल्यास नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अमीनो अॅसिड्स, एन्झाईम्स, व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. डेंग्यू तापामुळे शरीरात अशक्तपणा येतो, अशा परिस्थितीत नारळ पाण्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
हळद
तज्ज्ञांच्या मते डेंग्यूच्या रुग्णांनी हळदीचे सेवन करावे. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे चयापचय आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने डेंग्यूमध्ये फायदा होतो.
लिंबूवर्गीय फळे
डेंग्यू तापामध्ये किवी, संत्री यांसारखी आंबट फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. डेंग्यू तापामध्ये ही फळे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास तर मदत करतातच पण डेंग्यूपासून देखील मुक्ती मिळते.
डेंग्यू तापात काय खाऊ नये?
1. डेंग्यूच्या रुग्णांनी चहा, कॉफी, सोडा किंवा थंड पेय यांसारख्या पदार्थांपासून दूर राहावे. यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. डेंग्यू तापामध्ये हे तुमच्या शरीराला नुकसानकारक ठरू शकते.
2. डेंग्यूमध्ये मसालेदार अन्नापासून दूर राहावे. याचे सेवन केल्याने अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. तापातून बरे होण्यातही समस्या येऊ शकतात.
3. डेंग्यूच्या रुग्णांना तळलेले पदार्थ देऊ नयेत. यामुळे चरबी वाढते आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :