Menopause : रजोनिवृत्ती (Menopause) म्हणजे पाळी बंद होणं. स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. रजोनिवृत्तीमुळे हार्मोन्‍समध्‍ये होणारे बदल सामान्‍यत: महिलांच्‍या वयाच्‍या चाळीशीमध्‍ये सुरूवात होते. सरासरी भारतीय महिला पाश्चिमात्‍य देशांमधील महिलांच्‍या तुलनेत जवळपास पाच वर्ष लवकर रजोनिवृत्तीचा अनुभव घेतात. पाश्चिमात्‍य देशांमधील महिला जवळपास वयाच्‍या 46व्‍या वर्षी रजोनिवृत्ती अनुभवतात. यामुळे अनेक शारीरिक, मानसिक आणि लैंगिक लक्षणे उद्भवू शकतात. 


रजोनिवृत्ती ही अचानक होणारी प्रक्रिया नाही आहे. रजोनिवृत्तीची विविध लक्षणं आपल्याला वयाच्या विविध टप्प्यांत दिसू लागतात. 


लगेच होणारे त्रास 


यावेळी पाळी अनियमित होते. पाळी जास्त किंवा कमी जाते. कानावाटे गरम वाफा जातात. याशिवाय रात्रीच्या वेळी खूप घाम येतो. झोप न लागण्याचाा अनुभव यावेळी येतो. याबरोबरच थकवा, चिडचिड, भीती, विसरभोळेपणा यांसारखे अनेक प्रकारसुद्धा घडतात. 


काही काळानंतरचे होणारे त्रास 


लगेचच होणारे त्रास हळूहळू कमी होतात. मात्र, त्यानंतर वेगळ्या प्रकारचा त्रास सुरु होतो. हा त्रास अधिक कष्टदायक असतो. या त्रासामध्ये लघवीमध्ये जळजळ होणे. त्याचबरोबर हात, पाय, सांधे, कंबर दुखणे, सुरकुत्या येणे अशा सगळ्या समस्या यावेळी दिसून येतात. जसजसं वय वाढत जातं तसतसा हा त्रास अधिकच वाढत जातो. 


बऱ्याच वर्षांनंतरचे होणारे त्रास 


हाडं ठिसूळ होणं आणि हृदयरोगाचं प्रमाण वाढणं या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी उशिरा लक्षात येतात. बऱ्याचदा हे दोन्ही आजार प्राणघातकसुद्धा ठरू शकतात. रजोनिवृत्तीमुळे शरीरातील हाडांचे सर्वात जास्त नुकसान होते. त्यामुळे 45 ते 50 या वयोगटातील महिलांनी रजोनिवृत्तीची ही लक्षणं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 


रजोनिवृत्तीची लक्षणं


जर तुम्हाला प्री-रजोनिवृत्तीची लक्षणे देखील दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण तीही मोठी समस्या असू शकते. अनियमित मासिक पाळी येणे, मूडस्विंग होणे, लघवीचं प्रमाण कमी होणे इत्यादी ही प्री-रजोनिवृत्तीची लक्षणे असू शकतात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल