Health Tips : गेल्या काही दिवसांपून राजधानी दिल्लीसह मुंबईतही हवेच्या प्रदूषणाची लाट पसरत चालली आहे. एकीकडे थंडीचे दिवस सुरु असताना मुंबईत हवेच्या प्रदूषणाचा त्रास वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' (Doctor Tips) या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
मुंबई आणि दिल्लीच्या हवेतील शुद्धता खूपच कमी झाली आहे. प्रदूषणामुळे होणारे आजार कोणते? तसेच, प्रदूषणा दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यायची? या संदर्भात, डॉ. उन्मेश टाकळकर (सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद) यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
प्रदूषणामुळे होणारे आजार कोणते?
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे हवा जरी प्रदूषित असेल तरी आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला प्रदूषणामुळे होणारे त्रास लक्षात घेऊन आपण काळजी घेतली पाहिजे. जसे की, आपल्याला दमा, अस्थमा, डायबिटीस किंवा कोणती एलर्जी असल्यास अशी व्यक्तींना निश्चितच प्रदूषणाचा धोका जाणवतो. आणि त्यांना दमा, न्यूमोनिया, किंवा सर्दी अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता जास्त भासते.
वाढत्या प्रदूषणात स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?
हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे अनेकांना या प्रदूषणाचा त्रास होतो. अशा वेळी तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर नक्कीच तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
- जर तुम्हाला प्रदूषणाचा त्रास होत असेल तर तुम्ही अशा वेळी प्रवास करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.
- लक्षात घ्या. कोरोना जरी गेला असला तरी तो संपूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे मास्क वापरणे जरी सक्तीचे नसले तरी मात्र शारीरिक सुरक्षेसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे.
- प्रदूषणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेणे गरजेचे आहे.
यांसारख्या गोष्टींची जर तुम्ही विशेष काळजी घेतली तर नक्कीच हवेतील वाढत्या प्रदूषणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या बातम्या :