Psoriasis Diet : सोयरासिस (Psoriasis) हा अतिशय वेदनादायक आणि दीर्घकालीन आजार आहे. या आजारावर कोणतेच ठोस असे औषध नाही. मात्र खाण्याच्या सवईत काही बदल केल्यास हा आजार नियंत्रणात आणता येतो. सोयरासिस होण्याचे अनेक कारण आहेत. सोयरासिस होणाऱ्या लोकांची त्वचा जाडीभरडी होते , लाल पडते आणि मग त्वचेला खाज सुटू लागते. त्चचेच्या कोणत्याही भागात सोरायसिस होऊ शकतो. सोरायसिस या आजारामुळे होणाऱ्या वेदनाही अनेकदा असह्य होतात आणि रुग्णाला भयंकर त्रास होण्याची शक्यता असते.


गुडघे, कोपर, पाठीचा खालचा भाग यासारख्या अनेक ठिकाणी सोरायसिसचा अधिक त्रास होतो. हा एक त्वचेचा भयंकर आजार असून त्यात अधूनमधून वेदनांचं प्रमाण वाढत राहतं. या आजारावर कुठलाही ठोस उपाय नाही. शरीरातील सोरायसिस नियंत्रणात ठेवणं एवढा एकच उपाय यासाठी करण्यात येतो. सोरायसिस नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या आहारावर लक्ष ठेवणं आणि तो योग्य प्रकारे नियंत्रित (Control on food) करणं गरजेचं असतं. असे काही पदार्थ असतात जे शरीरातील सोरायसिस वाढवतात आणि त्याचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे सोरायसिसचा त्रास असलेल्या रुग्णांनी काही पदार्थ खाणं पूर्णपणे टाळायला हवे. 



  •  सोयरासिस असणाऱ्यांनी डेअरी पदार्थ (Dairy Food) खाणे टाळावे. पनीर , दूध , तूप आणि दही हे पदार्थ  पूर्णपणे बंद करावेत.

  • असे बरेच लोक आहेत ज्यांना शेंगदाणा किंवा त्याच्या तेलापासून अॅलर्जी आहे.  शेंगदाण्यापासून अॅलर्जी असणे सामान्य आहे, परंतु नंतर ही समस्या अधिक गंभीर रूप घेऊ शकते. यामुळे अतिप्रमाणात शेंगदाण्याचे सेवन करणे टाळावे.

  • जर तुम्हाला  सोरायसिस, त्वचेवर खाज सुटणे, जळजळ आणि पुरळ उठत असेल तर ओट्स खाणे टाळा. काही लाेकांना ओट्समुळे  त्वचेची ऍलर्जी होते. त्वचेच्या समस्यांमध्ये ओट्स खाण्यास अनेकदा डाॅक्टर देखील नकार देतात.

  •  एकूणच आरोग्यासाठी साखर अत्यंत हानिकारक मानली जात असली तरी त्वचेशी संबंधित समस्या सोरायसिसमध्ये ती खाण्यास सक्त मनाई आहे. अशा समस्यांमध्ये साखर टाळण्याचा सल्ला दिला जातो. 

  •  तसेच सायरोसिस असणाऱ्या लोकांनी  मांसाहार , मद्यपान आणि धुम्रपान करणे बंद करावे. 

  •  सोरायसिसच्या रुग्णांना ग्लूटेन्स असणारे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. पास्ता, नूडल्स, गव्हापासून बनलेले पदार्थ आणि काही प्रकारचे सॉस हे सोरायसिसच्या रुग्णांसाठी हानीकारक असतात. नूडल्स खाणं एरवीदेखील आरोग्यासाठी घातकच मानलं जातं.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Heart Attack in Kids : सावधान! लहान मुलांनाही येतोय हृदयविकाराचा झटका; यामागे नेमकं कारण काय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला