Thyroid : आजकाल बदलणाऱ्या जीवनशैलीचा (Lifestyle) आपल्या आरोग्यावर (Health) परिणाम होत चालला आहे. अनहेल्दी आहार, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी तसेज बैठी जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊन मधुमेहासारख्या (Diabetes) समस्या वाढत चालल्या आहेत. थायरॉईड (Thyroid) देखील यापैकीच एक आहे. थायरॉईडची समस्या पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये आढळते. ही अनुवांशिक समस्या आहे, त्यामुळे घरात कोणाला थायरॉईड असेल तर मुलांमध्ये त्याचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. 


थायरॉईड ही हार्मोनल असंतुलनाची समस्या आहे. तसेच या समस्येवर कायमस्वरूपी उपचार अजूनही उपलब्ध नाहीत. फक्त औषधे घेऊन आणि तुमच्या जीवनशैलीत बदल करून तुम्ही या समस्येचा सामना करू शकता. अशा परिस्थितीत थायरॉईडच्या रुग्णाने आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 


आरोग्य तज्ज्ञांच्या मते थायरॉईड, विशेषत: हायपोथायरॉईडीझम किंवा हाशिमोटोचा त्रास असलेल्या लोकांनी काही पदार्थ सावधानतेने खावेत. कारण या सर्व पदार्थांमध्ये गॉइट्रोजन आढळतात. हा एक पदार्थ आहे जो थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणू शकतो. हे थायरॉईड उत्तेजक संप्रेरक सोडण्यासाठी पिट्यूटरीला उत्तेजित करतात, अशा परिस्थितीत थायरॉईड पेशींच्या वाढीमुळे गॉइटर होतो.


थायरॉईडच्या रुग्णांनी 'या' पदार्थांपासून दूर राहावे


शेंगदाणा 


शेंगदाण्यात गोइट्रोजन आढळतो. यामुळे हायपोथायरॉईडीझमची स्थिती जास्त बिघडू शकते. त्यामुळे यावेळी शेंगदाणे खाणं टाळावं. 


नाचणी 


नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि फायबर उपलब्ध असते, त्यामुळे ते खाणे आरोग्यदायी चांगले मानले जाते. पण, यामध्ये गोइट्रोजेनिक अन्न असल्याने, ते भिजवून आणि शिजवल्यानंतर महिन्यातून 2 ते 3 वेळा जास्त खाऊ नये.


बदाम


खरंतर, बदाम हे मुळात अनेक आजारांवर मात करण्यासाठी वापरलं जाणारं ड्रायफूट आहे. बदामात सेलेनियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं. पण, बदाम हे गोइट्रोजेनिक अन्न आहे. त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांसाठी याचं जास्त प्रमाणात सेवन करणं चांगले नाही. म्हणून, हायपोथायरॉईडीझम असलेले लोक दररोज 3 ते 5 बदाम भिजवून किंवा भाजून खाऊ शकतात. पण, त्यापेक्षा जास्त खाऊ नका. 


सोया असलेले पदार्थ


सोया असलेले अन्न शरीराच्या थायरॉईड सप्लिमेंट्स योग्यरित्या शोषून घेण्याच्या क्षमतेवर बदल करू शकतात आणि प्रभावित करू शकतात. त्यात गोइट्रोजेन देखील आढळते, ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीमध्ये जळजळ होऊ शकते. त्यामुळे ते खाणे टाळावे.


गहू


गव्हात ग्लूटेन असते. हे संभाव्य गोइट्रोजेनिक अन्न आहे. ऑटोइम्यून हायपोथायरॉईडीझमच्या बाबतीत, गव्हाचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : स्वयंपाकाच्या तेलाचा तुमच्या आरोग्यावर होतोय खोलवर परिणाम; आजच 'या' आरोग्यदायी पर्यायांनी बदला