Health Care : अनेकांना दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी थकवा जाणवतो. अनेक वेळा जास्त स्ट्रेस आणि वर्क लोडमुळे देखील थकवा जाणवते. थकवा जाणवण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे लाईफस्टाईल आणि डाएटकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. थकवा दूर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
या कारणांमुळे जाणवू शकतो थकवा-
जर तुम्ही पाच कपपेक्षा जास्त चहा कॉफी दररोज पित असाल तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तसेच अनेक लोक, विशेषत: महिला या डाएटमध्ये प्रोटीन, विटामिन-डी3, बी12 यांचे प्रमाण कमी घेतात. ही पोषक तत्वे कमी झाल्यानं देखील थकवा जाणवतो.
थकवा दूर करण्यासाठी फॉलो करा या टिप्स
थकवा दूर करण्यासाठी दररोज सकाळी पाण्यात भिजवलेले काळे मनुके खावा. त्यामुळे शुहर लेव्हल नियंत्रणामध्ये राहते. तसेच डाएटमध्ये ग्रीन आि रेड ज्यूसचा समावेश करा. कॉफी किंवा चहा पिण्या ऐवजी डाएटमध्ये फळांचा समावेश केल्यानं थकवा जाणवत नाही आणि दिवसभर एनर्जी राहते. प्रोटिन शेक देखील तुम्ही दररोज सकाळी पिऊ शकता. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानं देखील थकवा जाणवतो. त्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या आणि दिवसभरात देखील योग्य प्रमाणात पाणी प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha