Rock Salt Health Benefits : सध्या चैत्र नवरात्री (Chaitra Navratri 2023) सुरु आहे. यावेळी उपवासादरम्यान अनेक जण सैंधव मीठ (Sendha Namak) म्हणजे रॉक सॉल्टचा (Rock Salt) वापर करतात. सैंधव मीठ आरोग्यासाठी अधिक लाभदायक असून याचे अनेक फायदेही आहेत. सैंधव मिठाचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. रॉक सॉल्टमुळे इम्युनिटीही वाढते. शक्यतो उपवासाच्या वेळी सेवन केलं जाणारं सैंधव मीठ दररोज खाल्यावरही तुम्हाला अनेक फायदे मिळतील. सैंधव मीठ म्हणजे रॉक सॉल्टचे आरोग्यासाठीचे फायदे जाणून घ्या.


सैंधव मीठ 


समुद्र किंवा तलावाचे खारे पाणी बाष्पीभवन झाल्यावर ते रंगीबेरंगी स्फटिक उरतात. यापासून रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ तयार केलं जातं. सैंधव मीठ हे एक प्रकारचं खनिज आहे. याचं सेवन केल्यास अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आरोग्यदायी ठरतं. सैंधव मिठालाच हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ असंही म्हटलं जातं. रॉक सॉल्टमध्ये 90 हून अधिक खनिजं आढळतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरचे प्रमाण अधिक असते.


सैंधव मीठ फायदेशीर का आहे?


सामान्य मिठाच्या तुलनेत सैंधव मिठामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक सारखे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. याशिवाय रॉक सॉल्टमध्ये लोह, मँगनीज, तांबे, कोबाल्ट यांचंही प्रमाण साध्या मिठापेक्षा जास्त आढळतात.


'हे' आजार होतील दूर



  • इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आणि घरगुती उपाय म्हणजे सैंधव मिठाचं सेवन

  • सैंधव मिठामध्ये अनेक प्राकृतिक गुण आढळतात. यामुळे शरीरातील वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांचं संतुलन राखलं जातं.

  • सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी सैंधव मीठ प्रभावी आहे.

  • सैंधव मीठ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.

  • रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

  • बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

  • सांधेदुखी आणि नैराश्य यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

  • सैंधव मीठ खाल्ल्याने लेक्ट्रोलाइट्सची पातळी नियंत्रणात राहते. हे स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक आहे. लेक्ट्रोलाइट्स असंतुलन झाल्यावर पेटके सुरू होतात. त्यामुळे रॉक सॉल्टचे सेवन यावरही फायदेशीर आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Electric Shock : एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यास कधी-कधी शॉक का लागतो? कधी विचार केलाय? जाणून घ्या वैज्ञानिक कारण