Shravan Fasting Rules : श्रावण अगदी काही दिवसांनर येऊन ठेपला आहे. येत्या 18 जुलैपासून श्रावणाला सुरूवात होते आहे. दरवर्षी श्रावण (Shravan 2023) महिना देशभरातील लोकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महिन्याला एक अत्यंत शुभ महिना समजला जातो. पावसाळ्याला सुरुवात झाली की श्रावण महिना भारतात येतो. हा महिना पिकांच्या कापणीकरता चांगला मानला जातो.  हिंदू धर्मातील मान्यतांनुसार श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक पूजा विधी आणि व्रत केले जातात. श्रावणात उपवास करताना काय काळजी घ्यावी (Shravan Fasting Foods). याबाबत आपण जाणून घेणार आहोत. श्रावणात तुम्ही देखील उपवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. घ्या जाणून.


उपवासात काय खावे


1. उपवास ठेवत असाल तो संपूर्ण महिनाभर प्रामाणिकपणे करावा.


2. उपवास  करत असताना आपण आजारी पडू नये याकरता शरीराला अनावश्यक असणारे पोषक आहार पुरवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी फळे, ड्रायफ्रुट्स नियमीत खावेत. तसेच शरीराला डिहायड्रेट ठेवण्याकरता उपवासाच्या दिवसात  ताक , फळांचे ज्युस तसेच पाणी प्या.


3. रताळे उपवासात खाणे फायदेशीर ठरू शकते. चवीला गोड असलेल्या रताळे उपवासाला उकडून खाल्ले जाते. पावसाळ्यात आरोग्यासाठी उत्तम असा हा पदार्थ आहे. 


4. श्रावणात (Shravan) दूधी भोपळा मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध असतो. यातून मिळणारे व्हिटॅमिन्स शरीरासाठी आवश्यक असतात. दूधीची भाजी किंवा दूधीचा हलवा घरात सहज बनवला जाऊ शकतो.


5. प्रामुख्याने सगळ्यांकडेच जेवणात साधं मीठ वापरले जाते. पण श्रावणात तुम्ही सेंद्रीय मीठाचा वापर करू शकता. सर्व किराणा दुकानात हे मीठ उपलब्ध असते. या मीठात आयर्नचे प्रमाण अधिक असते.


6. रात्रीच्या वेळी उपवास सोडायचा असल्यास अगदी हलका आहार घ्यावा. त्यासाठी खिचडी, वरण-भात-तूप असा आहार घेऊ शकता. यासोबतच मुळ्याची , काकडी किंवा गाजराची कोशिंबीर खाऊ शकता.


7. दही केवळ चवीला छानच नाही तर आरोग्यासाठी देखील चांगले आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. श्रावणातील उपवासादरम्यान दही (Curd Benefits) खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 


उपवासात काय खाणे टाळावे


1. श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण खाणे कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. मोहरीचे तेल, तिळाचे तेल, मसूर डाळ आणि वांगी यांसारखे पदार्थ खाणे प्रकर्षाने टाळावे.


2. तसेच श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान करणे पूर्णपणे टाळावे.


3. फळभाज्यांप्रमाणेच पालेभाज्यांवरही पावसात किड लागते. यामुळे या दिवसात पालेभाज्या खाणे टाळावे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Health Tips : 'यावेळी' पपई खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, गंभीर आजारांचा धोका होईल कमी