Health Tips : सध्याच्या काळात मानसिक स्वास्थ्याबरोबरच शारीरिक समस्यांचं प्रमाणही वाढू लागलं आहे. यामध्ये विशेषत: महिलांमध्ये पायांचं दुखणं फार वाढू लागलं आहे. अनेकदा आपण याकडे एक सामान्य वेदना म्हणून दुर्लक्ष करतो. जर तुम्हाला वेदनांबरोबरच स्नायू आखडून धरणे किंवा पाय थरथर कापणे यांसारख्या समस्या जाणवत असतील तर लक्षात घ्या ही एक सामान्य समस्या नाही. वैद्यकीय भाषेत याला रेस्टलेस लेग सिंड्रोम (Restless Leg Syndrome) म्हणतात. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास त्याचे रूपांतर पार्किन्सन्स नावाच्या समस्येत होऊ शकते. मात्र, रेस्टलेस सिंड्रोम म्हणजे काय आणि त्याची कारणे आणि लक्षणे कोणती हे सांगणार आहोत,


रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणजे काय? 


शरीरातील हार्मोन्समधील बदल आणि असंतुलन यामुळे व्यक्तीच्या शरीरातही अशी लक्षणे दिसू लागतात. जे लोक उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत, त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक दिसून येते. कधीकधी, अनुवांशिक (Genetic) कारणांमुळे, रेस्टलेस लेग सिंड्रोम देखील होतो. याशिवाय लोह आणि व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळेही ही समस्या दिसून येते. 


रेस्टलेस लेग सिंड्रोमची प्रमुख लक्षणे कोणती?


या समस्येमध्ये नेहमी असे दिसून येते की पायांवर काहीतरी रेंगाळत आहे. अशा वेळी पायांची थोडी हालचाल केल्यास आराम मिळतो. निद्रानाश देखील त्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. जर स्नायूंच्या ताणामुळे अस्वस्थता असेल तर ते रेस्टलेस लेग सिंड्रोमचे देखील लक्षण आहे.


रेस्टलेस लेग सिंड्रोमवर उपचार आणि प्रतिबंध उपाय काय?


रेस्टलेस लेग सिंड्रोमपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकता. यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, चिकन आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. याशिवाय इतर व्यसनांपासून दूर राहा. उदा..मध्यपान, धूम्रपान 


हे लक्षात घ्या 


जर तुम्हाला तुमच्या चाळीशीत या समस्येशी संबंधित लक्षणे दिसली तर निष्काळजीपणा करू नका. त्वरित डॉक्टरांना भेटा. उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यांसारख्या समस्या असतील तर अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :