Sleep is Superpower for Weight Loss : सध्या अनेक जण लठ्ठपणाच्या (Obesity) समस्येने त्रस्त आहेत. बदलती, व्यस्त जीवनशैली (Lifestyle) यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. यामध्ये लठ्ठपणा ही समस्या सर्वसाधारण आहे. तुम्हांलाही जर वाढत्या वजनाची समस्या भेडसावत असेल, तर एका सोप्या उपायानं तुम्ही यावर नियंत्रण मिळवू शकता. यासाठी तुम्हाला पुरेशी झोप (Sleep) घ्यावी लागेल. हो, हे अगदी खरं आहे. झोप वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डॉक्टरांच्या मते, अपुऱ्या झोपेमुळे लठ्ठपणाला आमंत्रण मिळतं. वजन कमी करण्यासाठी झोप अतिशय प्रभावी उपाय आहे.


झोप वजन कमी करण्यात फायदेशीर


वजन कमी करण्यासाठी झोप अत्यंत फायदेशीर आहे. अनेक वेळा लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात, काही जण डाएट करतात. पण झोपेकडे दुर्लक्ष करतात. ही चूक तुम्ही करु नका. वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोप पूर्ण न झाल्याने अधिक खाण्याची सवय लागते. यामुळे वजन वाढतं. शिवाय झोपेच्या कमतरतेमुळे चयापयच क्रिया बिघडते, हे सुद्धा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. 


झोपेचा शरीरातील पचनक्रियेशी थेट संबंध


शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आवश्यक आहे. डॉक्टरांच्या मते, झोपेचा आपल्या भुकेशी संबंध आहे. अपुऱ्या झोपेमुळे खाण्याचं प्रमाण वाढतं. पुरेशी आणि चांगली झोप याचा शरीरातील पचनक्रियेशी थेट संबंध आहे. त्यामुळे चयापचय यांसंबधित आजार आणि लठ्ठपणा संबंधित विकार होण्याची शक्यता असते. अपुरी झोप घेणारे व्यक्ती अधिक कॅलरीयुक्त पदार्थ खातात, त्यामुळे त्यांना अधिक थकवा येतो.


पुरेशी झोप घेणाऱ्या व्यक्तीमध्ये चरबी वाढण्याचं प्रमाण कमी


दररोज आठ तास झोप घेतल्याने वजन कमी करण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार, दररोज केवळ चार तास झोप घेणाऱ्याच्या शरीरातील चरबी 10 टक्क्यांनी वाढली. याउलट दररोज सात ते नऊ तास झोपणाऱ्यांच्या शरीरातील चरबी वाढण्याचं प्रमाण खूप कमी होतं. कमी झोप घेण्याऱ्या व्यक्तींचं मन एकाग्र नसते, त्यांच्यामध्ये ऊर्जेची कमतरता असते. यामुळे त्यांच्या कामाची क्षमताही बिघडते. यामुळे व्यायामाची कार्यक्षमताही बिघडते. परिणामी वजनावर परिणाम होतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या