Health Tips : सध्या सगळीकडे थंडीचे वारे वाहतायत. गुलाबी थंडीची (Winter) चाहूल लागताच एक गोष्ट मात्र जाणवतेय ती म्हणजे दिल्ली-एनसीआरमधील हवेचं प्रदूषण. या ठिकाणी प्रदूषणामुळे हवा दूषित होतेय. त्यामुळे AQI खूप वाढत आहे. खरंतर, दरवर्षीच दिल्लीत प्रदूषणामुळे हवा प्रदूषित होते. पण तुम्हाला माहित आहे का की, प्रदूषत विषारी हवा आणि AQI यांचा काय संबंध आहे? तसेच, या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
प्रदूषित AQI हा चिंतेचा विषय का आहे?
यूएस एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने (UAPA) नागरिकांना हवेच्या प्रदूषणाची पातळी आपल्या आरोग्यासाठी काय आणि केव्हा हानिकारक होते याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती देण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) नावाचे विशेष मशीन तयार करण्यात आले आहे. याद्वारे वायू प्रदूषणाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळते. एक सामान्य व्यक्ती दिवसातून किमान 22 हजार वेळा श्वास घेतो. ज्याद्वारे आपल्या शरीराला ऑक्सिजन मिळतो.
ऑक्सिजन समृद्ध हवा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण आपल्या सभोवतालच्या हवेत विषारी कण देखील असू शकतात. याला वायू प्रदूषण म्हणतात. AQI हवेतील प्रदूषण मोजण्याचे काम करते. चांगली हवा गुणवत्ता म्हणजे कमी प्रदूषक नसलेली स्वच्छ हवा. प्रदूषित हवा किंवा त्याऐवजी प्रदूषित AQI म्हणजे हवेतील घाणेरडे कण. ज्यामुळे फुफ्फुस आणि हृदयाचे आजार होऊ शकतात.
ग्राउंड लेव्हल ओझोनला पार्टिक्युलेट मॅटर देखील म्हणतात, ज्यामध्ये PM2.5 आणि PM10 देखील समाविष्ट आहेत. कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड देखील आहे जे फुफ्फुसांसाठी चांगले नाही.
हवेतील हे सर्व प्रदूषित कण म्हणजे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे आपल्या फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो.
शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ही लक्षणे शरीरात दिसतात
- ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपोक्सिमिया होतो. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.
- डोकेदुखीचा त्रास होतो
- श्वासोच्छवासाची समस्या जाणवते
- हृदयात धडधड सुरु होते
- त्वचेचा रंग बदलतो, विशेषतः नखे आणि ओठ
- खूप खोकला होतो
- शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूवर देखील परिणाम होतो
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :