ट्रेंडिंग
Health Tips : रजोनिवृत्तीमुळे वजन वाढतंच पण शरीरातही दिसतात 'हे' बदल; तज्ज्ञांनी सांगितलं कारण...
Health Tips : रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते.
Health Tips : स्त्रीमध्ये जेंव्हा मासिक पाळी येणं पूर्णपणे बंद होते त्या काळास ‘रजोनिवृत्ती होणे’ (Menopause) असं म्हणतात. वयाच्या 40 नंतर केव्हाही स्त्रीला (Women) रजोनिवृत्ती येऊ शकते. रजोनिवृत्ती ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर साधारणपणे 40 ते 55 वयानंतर येणारी एक सामान्य अवस्था असते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या प्रजनन अवयवामध्ये क्षीणता येण्यास सुरुवात होते, शरीरामध्ये हॉर्मोनल परिवर्तन होते आणि त्यामुळे मासिकस्त्राव पूर्णपणे बंद होण्यास सुरुवात होते. ज्याप्रमाणे मासिक पाळीबद्दल अनेक गैरसमज आहेत, त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीबद्दल देखील अनेक गैरसमज आहेत. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
रजोनिवृत्ती ही एक प्रक्रिया आहे जी सहसा पेरीमेनोपॉजपासून सुरू होते. पेरीमेनोपॉज काही वर्ष राहते आणि अनियमित मासिक पाळी आणि अनेक हार्मोनल बदलांसह असते. जेव्हा एखाद्या महिलेला सलग 12 महिने मासिक पाळी येत नसेल, तेव्हा तिने हे समजून घेतलं पाहिजे की आपण रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचलो आहोत. जर्नल ऑफ मिड-लाईफ हेल्थच्या मते, रजोनिवृत्तीचे संक्रमण 45-55 वर्षे वयोगटात सुरू होते.
रजोनिवृत्तीनंतर शरीरातील उष्णता वाढते का?
रजोनिवृत्तीमुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढू शकते, परंतु त्याबरोबरच तुम्हाला रात्री घाम येणे, मूड स्विंग्स होणे, झोप न लागणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्या टाळण्यासाठी मसालेदार अन्न, अल्कोहोल आणि गरम पेयांचं सेवन टाळलं पाहिजे.
रजोनिवृत्ती म्हणजे तुम्ही वृद्ध आहात का?
रजोनिवृत्ती दरम्यान महिलेला जास्तीत जास्त विश्रांती घेणं गरजेचं आहे. ही एक जैविक प्रक्रिया आहे. हा आजार किंवा विकार नाही. काही स्त्रियांना वयाच्या 30 व्या वर्षीच रजोनिवृत्तीचा अनुभव येतो. याचा अर्थ तुम्ही वृद्ध झालात असा होत नाही.
पेरीमेनोपॉझल टप्प्यात गर्भवती होण्याची शक्यता नाही?
पेरीमेनोपॉज दरम्यान प्रजनन क्षमता कमी होत असली तरीही तुम्ही गर्भवती होऊ शकता. गर्भधारणा टाळण्यासाठी, रजोनिवृत्ती होईपर्यंत गर्भनिरोधक वापरणं सुरू ठेवणे महत्वाचे आहे.
रजोनिवृत्तीमुळे वजन वाढते का?
रजोनिवृत्तीमुळे वजन वाढतेच असं नाही. मात्र, रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे शरीराची रचना बदलू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराची आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )