Health: संधिवात म्हणजे एका किंवा अनेक सांध्यांचा दाह आणि ही एक दीर्घकालीन आरोग्य स्थिती आहे जी अस्वस्थता, सांध्यांचा कडकपणा आणि मर्यादित हालचालींना आमंत्रण देते. संधिवात एखाद्याच्या गतिशीलतेवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करते. संधिवाताचे विविध प्रकार आहेत, जसे की ऑस्टियोआर्थरायटिस, जो सांध्यांची झीज झाल्यामुळे होतो. संधिवात, एक स्वयंप्रतिकार विकार आहे. संधिवाताने ग्रस्त असलेल्या अनेक व्यक्तींना असे आढळून येते की हवामानातील बदलांमुळे त्यांची लक्षणे तीव्र होतात. अनेकांना उबदार, कोरड्या हवामानात पेक्षा थंडीत तसेच पावसाळ्यात जास्त वेदना जाणवू शकतात. संधिवात असलेल्या ऋतूतील बदल यांदरम्यान सावधगिरी बाळगली पाहिजे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. नवी मुंबईतील सीवूड्स आणी वाशीचे ऑर्थेापेडिक सर्जन डॉ. अभय छल्लानी यांनी संधिवाताच्या रुग्णांनी काय करावं? काय करू नये? कोणत्या गोष्टींनी सांधेदुखी कमी होण्यास मदत होईल याविषयी टीप्स दिल्या आहेत.
या गोष्टी करणं टाळा
नियमित शारीरिक हालचाली केल्याने लवचिकता वाढवून आणि तुमचे स्नायू बळकट होतात आणि संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो. पोहणे किंवा सायकलिंगसारखे हलके व्यायाम करा आणि व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही पुरेसे वॉर्म अप करत आहात याची खात्री करा. सांध्यांवर दाब येईल अशा क्रिया करणे टाळा. दररोज स्ट्रेचिंग करायला विसरु नका. कोणतीही फिटनेस दिनचर्या सुरू करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. बाहेरचे हवामान थंड असताना शक्यतो बाहेर फिरणे चाळा टाळा. गुडघ्यांमध्ये संधिवात असल्यास खाली बसणे, मांडी घालून बसणे किंवा पायऱ्या चढणे टाळा.
हे सोपे उपाय
तुमच्या स्नायूंमध्ये उबदारपणा राखण्यासाठी आणि स्नायुंमधील कडकपणा टाळण्यासाठी संपुर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला. खुप थंड वातावरण असल्यास थर्मल कपड्यांचा वापर करा. थंडीच्या दिवसात थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हातमोजे, कान झाकण्यासाठी टोपी आणि पायात मोजे घाला. वेदना कमी करण्यासाठी आणि स्नायुंचा कडकपणा कमी करण्यासाठी शरीर उबदार राखणारे पर्याय निवडा. तुमच्या स्नायूंमधील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी हीटिंग पॅड, टॉवेल थेरेपी वापरणे किंवा गरम पाण्याने आंघोळ करणे योग्य राहिल.
वजनावर नियंत्रण अन् भरपूर पाणी पिणं गरजेचं
हे ज्ञात सत्य आहे की जास्त वजन तुमच्या सांध्यांवर अतिरिक्त दबाव टाकते, ज्यामुळे संधिवाताची लक्षणे वाढण्याची शक्यता असते. वजन नियंत्रित राखल्यास तुम्ही या ताणातून काही प्रमाणात आराम मिळवू शकता, अस्वस्थता कमी करू शकता आणि निरोगी तसेच आनंदी राहू शकता. पुरेसे पाणी प्यायल्याने तुमच्या सांध्यांना पुरेसे वंगण मिळेल आणि सांध्यातील सूज कमी होऊ शकते. सांध्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान १२-१५ ग्लास पाणी प्या.
तुमच्या आहाराकडे लक्ष द्या:
संधिवात असलेल्यांनी साखर, रिफाइंड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. ओमेगा-३ फॅटी अॅसिड, जसे की मासे, जवस, अक्रोड, बेरी आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त पालेभाज्या खा. तज्ञांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्या.जळजळ, सांध्याचा अतिवापर, थंड हवामान आणि बैठी जीवनशैली यासारख्या विविध कारणांमुळे संधिवातासंबंधी वेदना वाढतात. जेव्हा लोक जास्त वेळ बसून राहतात, व्यायाम करत नाहीत, स्ट्रेचिंग करत नाहीत किंवा वजन नियंत्रित राखत नाहीत तेव्हा सांधेदुखी होते. प्रक्रिया केलेले आणि शर्करायुक्त पदार्थांसह चुकीचा आहार आणि जास्त वजन यामुळे सांध्यावर ताण येऊ शकतो, ज्यामुळे अस्वस्थता आणि वेदना वाढू शकतात. यामुळे दैनंदिन कामात अडथळे येतात.
सक्रिय जीवनशैली बाळगणे, निरोगी वजन राखणे आणि पुरक आहाराचे सेवन केल्याने सांधेदुखी कमी होण्यास आणि गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. व्हिटॅमिन डी साठी सकाळचा सूर्यप्रकाश मिळविणे, नियमित स्ट्रेचिंग आणि आणि योग्य हायड्रेशन हे सांधे लवचिक राहण्यासाठी आणि सांध्यांमधील कडकपणा कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. सांध्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि निरोगी जीवनशैली बाळगणे ही काळाची गरज आहे. योग्य ती खबरदारी घेत सांध्यांवर अधिक ताण येईल अशा तीव्र हालचाली करणे टाळा, अशी प्रतिक्रिया ग्लेनईगल्स हॉस्पिटल परळचे संचालक आणि प्रमुख ऑर्थोपेडिक डॉ. गिरीश भालेराव यांनी व्यक्त केली.
हेही वाचा:
PHOTO: काडिपत्याचे फायदे वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल; जाणून घ्या!