Health: मणक्याच्या आरोग्याबाबत असलेल्या गैरसमजुती आजच दूर करतुम्हाला पाठदुखी नाही म्हणून तुमच्या पाठीचा कणा निरोगी आहे असे तुम्हाला वाटते मात्र वास्तविकत पाहता हा एक मोठा गारसमज असून प्रत्येकाने आपल्या मणक्याच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुंबईचे ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉ. आयुष शर्मा यांनी मणक्याच्या आरोग्याबद्दल असणाऱ्या गैरसमजूती दूर केल्या आहेत.
मणक्याच्या आरोग्याबाबत गैरसमजूती व वास्तविकता
ते सांगतात, तुमचे शरीर निरोगी, संतुलित राखणे तसेच शारीरीक हालचालींमध्ये तुमच्या पाठीचा कणा महत्त्वाची भूमिका बजावतो. मणक्याच्या आरोग्याबाबत अनेक गैरसमजुती आहेत ज्या वेळीच दूर करणे गरजेचे आहे. ज्यामुळे मणक्याला हानी पोहोचण्यापासून रोखता येऊ शकते. या गैरसमजुती वाईट सवयी, चुकीचे उपचार, धोकादायक असे घरगुती उपचार आणि सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्यास कारणीभूत ठरते. मणक्याच्या आरोग्यासह तुमच्या एकूण आरोग्याच्या कल्याणासाठी, गैरसमजुती दूर करत त्यामागची वास्तविकता जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी नेहमी सतर्क राहणे आणि मणक्याच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाहूया मणक्याच्या आरोग्याबाबत असलेल्या सामान्य गैरसमजुती
गैरसमज : जर पाठदुखी नसेल तर तुमचा पाठीचा कणा पूर्णपणे निरोगी आहे.
वास्तविकता : पाठदुखी नसतानाही मणक्याच्या समस्या उद्भवू शकतात. चुकीची शारीरीक स्थिती, मणक्यातील डिस्कचे नुकसान किंवा मज्जातंतूंवर येणारा दाब यासारख्या परिस्थिती प्रगत पातळीपर्यंत पोहोचेपर्यंत सुरुवातीची लक्षणे दिसून येत नाहीत. नियमित तपासणी करून घेतल्याने किंवा तुमची शारीरीक स्थिती सुधारल्याने या समस्या वेळीच लक्षात येऊ शकतात.
गैरसमज : जड वस्तू उचलल्याने पाठीच्या समस्या उद्भवतात.
वास्तविकता : योग्य तंत्र वापरून जड वजनाच्या वस्तू उचलल्याने पाठीशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. जड वस्तू उचलण्यासाठी चुकीच्या तंत्रांचा वापर केल्याने, जसे की गुडघ्यांऐवजी पाठ वाकवणे, समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
गैरसमज : काहीसे वाकवेले शरीर ही काही फार मोठी बाब नाही.
वास्तविकता : थोडा वेळ वाकल्याने सुरुवातीला काही त्रास जाणवत नाही, परंतु जास्त वेळ वाकल्याने तुमच्या मणक्यावर जास्त दबाव येऊ शकतो. यामुळे मणक्यात कडकपणा येऊ शकतो आणि दीर्घकालीन आसनाशी संबंधित समस्या आणि वेदना देखील उद्भवू शकतात.
गैरसमज : व्यायामामुळे पाठदुखी आणखी वाढते.
वास्तविकता : व्यायामामुळे तुमच्या पाठदुखीत वाढ होऊ शकते असा एक सामान्य समज आहे. योग्य आसनासह योग्य प्रकारचा व्यायाम केल्याने तुमची पाठ मजबूत होण्यास आणि तुमच्या मणक्याला आधार देण्यास मदत होते. शरीर निष्क्रिय राहिल्याने तुमचा मणका कडक होऊ शकतो आणि वेदना उद्भवू शकतात.
हेही वाचा: