Blood Pressure: हाय ब्लडप्रेशर (High Blood Pressure) ही सध्या जवळपास सर्वांमध्येच आढळून येणारी समस्या आहे. अनियमीत जीवनशैली (Irregular lifestyle) आणि चुकीचा आहार (Wrong Diet) यांमुळे अगदी कमी वयातच अनेकांना हाय ब्लडप्रेशरची लक्षणं दिसू लागतात. हाय ब्लड प्रशेरच्या समस्येला तुमचं वाढलेलं कारणीभूत ठरतं. तसेच, प्रत्येक वयोगटात हाय ब्लडप्रेशरची समस्या वाढत आहे. त्याला हायपरटेन्शन (Hypertension) असंही म्हणतात. जर हाय ब्लडप्रेशर मर्यादेपलीकडे वाढला, तर हार्ट अटॅक (Heart Attack) आणि स्ट्रोक यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. हे टाळण्यासाठी हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. तुम्ही या उपायांच्या मदतीनं हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवू शकता. 


सामान्यतः हाय ब्लड प्रेशरच्या समस्येनं त्रस्त असणाऱ्या व्यक्ती रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधं घेतात, परंतु तुम्हाला हवं असल्यास जीवनशैली आणि तुमच्या दैनंदिन आहारात बदल करून औषधांशिवाय हाय ब्लडप्रेशरवरही नियंत्रण मिळवू शकता. चला जाणून घेऊयात, औषधांशिवाय हाय ब्लडप्रेशर कसं नियंत्रणात ठेवता येईल, हे जाणून घेऊयात...


औषधांसोबतच तुम्ही काही घरगुती उपयांनीही रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता, जाणून घ्या काही खास टिप्स...


1. जर तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल, तर जंक फूडचं सेवन पूर्णपणे बंद करा. फक्त घरी शिजवलेलं निरोगी अन्न खा. तुमच्या आहारात धान्य, फळे, भाज्या, कमी फॅट्स असलेले दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे आणि काजू यांचा समावेश करा. सोडा, ज्यूस आणि मीठ यांचं सेवन कमी करा.


2. दररोज अर्धा ते एक तास व्यायाम केल्यास उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. व्यायामामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. गंभीर आजारांचा धोका टळतो.


3. जास्त वजनही तुमचं हाय ब्लडप्रेशर वाढवण्यासाठी कारण ठरू शकतं. त्यामुळे वजन कमी करून तुम्ही हाय ब्लडप्रेशरसोबतच शरीराच्या इतर समस्याही नियंत्रणात ठेवू शकता. जास्त तणावामुळेही ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी तणावापासून दूर राहा. अजिबात टेन्शन घेऊ नका. 


4. जर तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल, तर मद्यपान करणं टाळा. तसेच, धूम्रपान करू नका. कारण यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. धूम्रपान आणि अल्कोहोल सोडल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
 
5. जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल, तर तुम्ही वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. औषधांचा आणि जीवनशैलीतील बदलांचा किती परिणाम होतो हे यावरून दिसून येते. सर्व प्रयत्न करूनही जर बीपी कमी होत नसेल, तर योग्य उपचार करा, कारण कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सावध राहा, पथ्य पाळा आणि काळजी घ्या. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


अस्वस्थता, वेदना अन् उलट्या, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची लक्षणं कोणती? WHO कडून यादी ट्वीट