Dry Eye Syndrome : वाढते प्रदूषण आणि थंड हवामान या दोन्हीमुळे आपले डोळे (Eyes) कोरडे होतात. हवेतील प्रदूषक तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे डोळे कोरडे होऊ लागतात. तसेच, थंड हवामानात हवा कोरडी असते, ज्यामुळे डोळे कोरडे होतात. या समस्येला 'ड्राय आय सिंड्रोम' म्हणतात. हे थांबविण्यासाठी काय उपाय आहेत? ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती नेमक्या कोणत्या हे जाणून घेऊयात.


ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय?


क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, ड्राय आय सिंड्रोम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये डोळ्यांच्या परिणाम होतो. टीयर फिल्मडोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. अश्रूंच्या थरातील समस्यांमुळे डोळ्यांत दिसण्यात अडचण येऊ शकते. डोळ्यांत अश्रू नसल्यामुळे किंवा ते लवकर कोरडे झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे किंवा अंधुक दृष्टी येण्यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.


लक्षणे काय आहेत?



  • डोळ्यांची जळजळ होणे

  • धूसर दृष्टी

  • प्रकाशाचा त्रास होणे

  • डोळ्यांची उघडझाप करण्यात अडचण

  • डोळ्यांना खाज सुटणे

  • डोळे लाल होणे

  • जास्त अश्रू येणे


कसा प्रतिबंध कराल?


ब्रेक घ्या : फोन किंवा लॅपटॉप स्क्रीनकडे बराच वेळ पाहिल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, जर तुम्हाला बराच वेळ स्क्रीनकडे पाहावे लागत असेल तर, डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी वेळोवेळी ब्रेक घ्या.


प्रदूषण टाळा : हवेत असलेल्या हानिकारक प्रदूषकांमुळे डोळे कोरडे होऊ शकतात. त्यामुळे प्रदूषणापासून डोळ्यांचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे बाहेर जाताना चष्मा वापरा जेणेकरून तुमच्या डोळ्यातील प्रदूषण कमी होईल.


ह्युमिडिफायर : हिवाळ्यात हवा कोरडी होते, त्यामुळे डोळेही कोरडे होऊ लागतात. हे टाळण्यासाठी, तुमच्या खोल्यांमध्ये ह्युमिडिफायर वापरा. यामुळे तुमच्या डोळ्यातील ओलावा टिकून राहील.


धूम्रपानापासून दूर राहा : धूम्रपानामुळे तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धुम्रपान करू नका.


डॉक्टरांचा सल्ला घ्या : डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या बरी होत नसल्यास, डॉक्टरांशी थेट संपर्क साधा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात