Pregnancy Tips : अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, गर्भधारणेदरम्यान तणावाचा भविष्यात मुलाच्या वर्तनावर नकारात्मक प्रभाव पडतो. या अभ्यासात गर्भवती महिलांच्या तणावाची पातळी मोजण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या मुलांच्या मानसिक आरोग्याची लक्षणे लक्षात आली.
या अभ्यासात, 55 अभ्यासांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले, ज्यामध्ये एकूण 45,000 सहभागी होते आणि असे आढळून आले की, ज्या महिलांना गर्भधारणेदरम्यान तणाव आणि चिंताग्रस्त समस्या होत्या, त्यांची मुले ADHD चा धोका जास्त आहे. हा प्रभाव 2-5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अधिक दिसून आला. या अभ्यासातून आपण समजू शकतो की, गर्भधारणेदरम्यान तणाव आणि चिंता मुलासाठी धोकादायक असू शकते. त्यामुळे या काळात मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया गरोदर महिलांचा ताण कसा कमी होतो.
पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा
तणावाचं सर्वात मोठं कारण झोपेची कमतरता असू शकतं. तसेच, गर्भधारणेदरम्यान, रात्री झोपण्यास त्रास होऊ शकतो आणि याची अनेक कारणे असू शकतात. म्हणून, तुम्ही दिवसभरात थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला आणि मनालाही आराम मिळेल.
स्वतःसाठी वेळ काढा
स्त्रिया अनेकदा घरच्या आणि ऑफिसच्या कामात इतक्या मग्न असतात की त्यांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. यासाठी गर्भधारणेदरम्यानआपल्या दैनंदिन दिनचर्येतून स्वत:साठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करा आणि या काळात चित्रकला, गाणं, एखादं पुस्तक वाचा. यांसारखे तुमच्या आवडीचे छंद जोपासा.
ध्यान करा
तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी ध्यान हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळतो आणि तुमच्या भावनांचे व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे करता येते. याबरोबरच, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलल्यानंतर काही सोपे योग देखील करू शकता, जे तुम्हाला तणाव कमी करण्यात मदत करू शकतात.
मदतीसाठी संकोच करू नका
गर्भधारणेदरम्यान, शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे खूप थकवा येतो आणि गोष्टी सुरळीत करणे खूप कठीण होते. म्हणून, आपल्या जोडीदाराची, कुटुंबातील सदस्याची किंवा मित्रांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :