Health Tips:  निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात आहार घेणं महत्वाचा आहे . जर तुम्ही नीट आहार घेतला  तर संसर्गजन्य रोग, विविध आजार आणि कुषोषण याला आळा घालण्यास मदत होईल. एकीकडे वाढलेलं शहरीकरण, बदलती लाईफस्टाईल यामुळे खाण्याच्या पद्धती बदलेल्या आहेत. आजकाल जास्त प्रमाणात कॅलरी, जास्त प्रमाणात आणि सोडियम असलेले अन्न खाल्लं जातं. 


पोषणतज्ञ पायल रंगर, वेलनेस अँड हेल्थ कोच (Nutritionist Payal Rangar) यांनी ABP Live ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कोणते पदार्थ जास्त प्रमाणात खावेत हे सांगणं जरा कठीण आहे. पण तुमच्या आहारात कर्बोदके, प्रथिने, फायबर आणि फॅट यांसारख्या गोष्टी आहेत का हे ओळखा आणि आहारात या पाच गोष्टीचा नक्की समावेश करा 


हिरव्या भाज्या (Green vegetables)


पालेभाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात. त्यात फायबर , कॅल्शियम, लोह मॅग्रेशियम, झिंक आणि व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे तुमच्या आहारात पालक, (Spinach) ब्रोकली , (broccoli), मेथी (fenugreek) आणि इतर पालेभाज्यांचा नक्की समावेश करा त्याच प्रमाणे तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा सलाड देखील बनवू शकता  


अक्रोड (Walnuts)


अक्रोड (Walnuts) खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे . कारण अक्रोडमध्ये ओमेगा - 3   त्याच प्रमाणे फॅटी अॅसिड याचं प्रमाण जास्त आहे. अक्रोडमध्ये असलेले   मोनोअनसॅच्युरेटेड (monounsaturated) आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट ( polyunsaturated fat)  खरोखरच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 


एवोकॅडो (Avocado)  


एवोकॅडो (Avocados)मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहे.  तुमच्या आतड्यांसाठी फायबर महत्वाचं आहे.  एवोकॅडोमुळे तुमचं  हृदय,  (heart) आतडे, (intestines) मेंदू,(brain)  केस (hair)  आणि त्वचेचे (skin) आरोग्य सुधारते.


सब्जा   (Chia seeds) 


सब्जा शरिरासाठी पौष्टिक आहे . त्यात लोह , (iron) कॅल्शियम  (calcium) आणि बी व्हिटॅमिन ( Bvitamins) मोठ्या प्रमाणात आढळतं. सब्जामुळे  रक्तदाब कमी होतो. त्याच प्रमाणे तुमच्या सांध्याचं आणि हाडाचं आरोग्य सुधारतं. सब्जाचा आहारात वापर केल्यास चांगली झोप लागते.  


तृणधान्य  (Whole grain)


 तृणधान्यांचा (Whole grain) तुमच्या आहारात समावेश करा. कारण रोजच्या आहारात  कर्बोदके (carbs) आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे तुमचं वजन (weight) नियंत्रणात राहत.  हृदयरोगाचा धोका (heart disease) कमी होता. त्याचप्रमाणे कर्करोगाचा (cancer)  धोकादेखील  कमी होता. 


तुमच्या निरोगी जीवनशैलीसाठी तुम्हाला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. त्यामुळे संतुलित आहार घ्या आणि तंदुरस्त राहा.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :