Coconut Water Benefits: उन्हाळा सुरु झाला की आपल्यातले बरेचजण नारळ पाण्याच सेवन करतात. नारळ पाणी हे उत्तम पेय आहे. नारळपाणी रोज प्यायल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती अधिक बळकट होते आणि तुमची त्वचादेखील तुकतुकीत राहते.   नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, अँटिऑक्सिडंट्स, (antioxidants)अमीनो अॅसिड  (Amino acid) आणि साइटोकिनिन्स यांसारख्या विविध खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात.  नारळ पाण्यात काही महत्वाचे घटक असतात जे शरीरासाठी महत्वाचे असतात. आज आपण नारळ पाणी (Coconut Water) पिण्याचे फायदे काय  आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. 


नारळ पाणी पिण्याचे फायदे (Coconut Water Benefits)


1.  नारळ पाणी  (Coconut Water)  प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही 


2. नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी ( weight Lose)   करण्यास मदत करते. कारण वजन कमी करण्यासाठी सोडा आणि ज्यूस यांसारख्या इतर पेयांपेक्षा नारळ पाण्यात कमी कॅलरीज असतात. एक कप नारळ पाण्यात फक्त 48  कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी नारळपाणी उत्तम पर्याय आहे. 


3. नारळ पाण्यामुळे तुमचा मधुमेहदेखील आटोक्यात  राहण्यास मदत होते.  नारळातील पाणी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास नारळपाणी फायदेशीर आहे 


4 .तुम्हाला हृदयरोग (Heart attack) टाळायचा असेल तर तुम्ही नारळपाणी प्या.. कारण रक्तातील कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि  हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास नारळपाणी मदत करते. कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे.  


5 . जर तुम्हाला पचनक्रिया (digestion) सुरळीत करायची असेल तर तुम्ही नारळ पाण्याचं सेवन करा,कारण पाण्यात  भरपूर प्रमाणात मॅंगनीज असते जे तुमच्या आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात 


6. जेव्हा तुम्हाला थकवा  किंवा तणाव जाणवत असेल तेव्हा तुम्ही नारळ पाण्याचं सेवन करा. एक कप नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला रिलॅक्स आणि फ्रेश वाटेल.


7. नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमची त्वचा (Skin)  तुकतुकीत राहते, चेहऱ्यावरील मुरुम , फोड कमी होण्यास मदत होते.  


  रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. आपले शरीर हायड्रेटेड (Hydrated) राहते. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)