Health Tips : आजच्या धकाधकीच्या जीवनात रक्तदाब (Blood Pressure) वाढणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी ही समस्या फक्त ज्येष्ठ लोकांमध्येच दिसायची. पण आजकाल वीस ते पंचवीस वर्षांच्या तरुणांमध्येही ही समस्या सामान्य झाली आहे. एवढेच नाही तर, आजच्या स्पर्धात्मक जीवनात पुढे जाण्याच्या शर्यतीत अनेक मुलेही उच्च रक्तदाबाचे बळी ठरतायत. 


हिवाळ्यात (Winter Season) रक्तदाब वाढणे ही एक सामान्य बाब आहे. कारण या ऋतूमध्ये रक्तपुरवठ्यासाठी हृदयावर (Heart) नेहमीच दाब पडतो आणि या दाबामुळे रक्तदाब कमी-जास्त होतो. त्यामुळे या समस्येला हलक्यात घेऊ नका. रक्तदाब वाढणे हा हायपरटेन्शनचा पहिला टप्पा आहे, ज्यामुळे नंतर ब्रेन स्ट्रोक, हार्ट फेलियर किंवा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो. अशा परिस्थितीत काही महत्त्वाचे उपाय करून तुम्ही सतर्क राहू शकता. रक्तदाब नेमका का वाढतो? आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नेमके उपाय कोणते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


याआधी जाणून घेऊयात रक्तदाब का वाढतो?



  • थंडीत आळस करून योगाभ्यास हलक्यात घेतल्याने 

  • सिगारेट, मद्यपान आणि इतर मादक पदार्थांचे सेवन केल्यास 

  • जास्त मीठ खाणे आणि अवेळी जेवणे. 

  • थंड वातावरणात जास्त वेळ बाहेर राहिल्याने तुमच्या हृदयावर ताण पडू शकतो.

  • जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल आणि औषधाकडे दुर्लक्ष केल्यास 

  • स्टिरॉइड्स दिल्यानेही रक्तदाब वाढतो.


हिवाळ्यात रक्तदाब संतुलित आणि सतर्क कसा ठेवायचा? 



  • पोटॅशियम समृद्ध मुळा शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. तुम्ही मुळा कच्चा किंवा भाजी करूनही खाऊ शकता.  

  • बीटा कॅरोटीन आणि पोटॅशियमने समृद्ध गाजर शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित ठेवते.

  • मेथीच्या हिरव्या भाज्यांमध्ये फायबर भरपूर असते आणि त्यात सोडियमचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

  • पालक हे पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहाने समृद्ध असलेले एक सुपर फूड आहे, जे धमनीच्या भिंती जाड होण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो आणि रक्तदाब संतुलित राहतो. 

  • बीट, व्हिटॅमिन बी आणि अँटी-ऑक्सिडेंट्सने समृद्ध, आपल्या शरीरात रक्तदाब संतुलित ठेवतो.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय