मुंबई : अनेकदा पायाला वारंवार सूज येते. बहुतांशीजणांकडून आज-उद्या आराम वाटेल म्हणून अनेकजण आजाराकडे दुर्लक्ष करतात. मात्र, पायाला अचानकपणे सूज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पायाला सूज हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे हे महागात पडू शकते.
खरतर शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा असतो. जेव्हाही एखाद्या आजाराची बाधा होते, तेव्हा शरीराकडून त्याचे संकेत मिळू लागतात. त्यामुळे हे संकेत समजून घेऊन त्यावर योग्य वेळी उपचार करून घेतल्यास गंभीर आजारांपासून वाचू शकतो.
पाय सुजणे हे किडनी व्यवस्थित काम करत नसल्याचे लक्षण आहे. याशिवाय शरीराच्या या भागांमधूनही किडनीचा आजार ओळखता येतो.
ही लक्षणे देतात किडनीच्या आजाराचे संकेत
सुजलेले पाय
जेव्हा पाय किंवा घोट्यावर सूज दिसून येते तेव्हा ते मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण असू शकते. जेव्हा मूत्रपिंडात सोडियम पुरेसे प्रमाण नसते, तेव्हा ते योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम नसते. अशावेळी पाय सुजतात. म्हणूनच अशी लक्षणे दिसल्यावर तुम्ही ताबडतोब सतर्क व्हावे.
लघवीत फेस किंवा बुडबुडे तयार होणे
जर लघवीमध्ये फेस किंवा बुडबुडे तयार होत असतील तर याचा अर्थ मूत्रातून प्रथिने जात आहेत. हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण असू शकते. म्हणूनच अशी लक्षणे दिसल्यावर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
वारंवार लघवी होणे
वारंवार लघवी होणे हे देखील किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. मात्र, वारंवार लघवी होणे हे इतर रोगांचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डोळ्याभोवती सूज येणे
जेव्हा किडनी पोषक द्रव्ये नीट फिल्टर करू शकत नाही, तेव्हा लघवीतून मोठ्या प्रमाणात प्रथिने बाहेर पडू लागतात. त्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागात सूज येऊ लागते. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
स्नायू दुखणे
जेव्हा किडनी आपले काम नीट करू शकत नाही, तेव्हा शरीरात इलेक्ट्रोलाइट असंतुलन होते. अशा परिस्थितीत कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता असते आणि स्नायूंमध्ये वेदना वाढतात. हे देखील किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे.
पायांना सूज आल्यास काय करावे
जेव्हा-जेव्हा पायांना सूज दिसली तेव्हा जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे, मूत्रपिंड सहजपणे शरीरातून सोडियम काढून टाकू शकतात आणि मॅग्नेशियम ऑब्जर्व करू शकतात. असे केल्याने किडनीचे कार्य सुरळीत राहते. अनेकदा पाणी कमी प्यायल्याने पायाला सूज येते. म्हणूनच पाणी पिणे आणि फळे आणि भाज्या खाणे आवश्यक आहे. त्यामुळे किडनीला व्यवस्थित काम करण्यास मदत होते.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. एखाद्या आजाराशी संबंधित लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचार करावेत)