मुंबई : सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांचं अनेक वेळा आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांही उद्भवतात. व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना पुरेशी झोपही मिळत नाही, त्यातच तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळतं. यासोबत सध्या लोकांमध्ये आणखी एक समस्या प्रामुख्याने दिसून येत आहे, ती म्हणजे झोपेत बोलणे किंवा बड-बडणे.


आजकाल अनेक लोकांमध्ये झोपेत बोलण्याची समस्या आहे. बरेच लोक झोपेत काहीतरी बडबडतात. काही पालकांना वाटतं की, आपलं मूल आज जास्त खेळलं म्हणून ते झोपेत काहीतही बडबड करत आहे. ही समस्या फक्त लहान मुलांमधेच नाही तर, वयस्कर आणि वृद्धांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. झोपेत बोलणे, हे अनेक जण खूप सामान्य मानतात. पण, ही क्रिया एखाद्या आजाराशी संबंधित आहे. ही गंभीर आजाराची लक्षणे असून शकतात, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नका.


स्लीप टॉकिंग हा एक प्रकारचा स्वप्न विकार (Sleep Disorder) म्हणजेच ड्रीम डिसऑर्डर आहे. यालाच पॅरासोम्निया (Parasomnia) म्हणतात. पॅरासोम्नियामध्ये लोकांना झोपेत बोलण्याची सवय असते. ही लोक झोपेत काहीतरी बोलतात किंवा बडबड करतात. मात्र, ते काय बोलतात हे, इतरांना समजत नाही. इतकंच काय तर त्या व्यक्तीलाही ठाऊक नसतं की, नक्की आपल्यासोबत काय होतंय.


झोपेत बोलण्यामागे काय कारणं असू शकतात? जाणून घ्या.


लोक झोपेत का बोलतात?


थकवा 


थकवा आणि झोप यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. जेव्हा तुम्ही खूप थकलेले असता, तेव्हा तुम्हाला गाढ झोप लागते. थकवा असूनही झोप न येण्याच्या समस्येने काही लोकांना त्रास होतो. यामुळेच असे लोक रात्री झोपताना अनेकदा बोलताना आढळतात.


नैराश्य 


नैराश्य असल्याच व्यक्तीला शांत झोप लागत नाही. झोपेत असतानाही अशा व्यक्ती अनेक वेळा नैराश्याच्या कारणांचा किंवा त्याच्याशी संबंधित स्वप्नांचा विचार करत राहतात. अनेक वेळा नैराश्यामुळे त्याला कशाची तरी भीती वाटू लागते, ज्यामुळे ते झोपेत बोलू लागतात.


अनिद्रा किंवा अपुरी झोप


जर एखाद्याला किमान 7 ते 8 तास पुरेशी झोप मिळत नसेल तर, त्याला झोपेत बोलण्याच्या समस्या उद्भवते.


ताप


खूप ताप असेल तरही अनेक वेळा लोक झोपेत बडबड करायला लागतात.


यावर उपाय काय?


1. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.


2. तणाव आणि चिंता यापासून दूर राहा.


3. आनंदी राहा आणि नैराश्यापासून मुक्तता करण्याच प्रयत्न करा.


4. सकारात्मक विचार करा.


5. योग किंवा ध्यान करा.


6. तुमचे आवडते उपक्रम करा, ज्यामुळे तुमचा तणाव दूर होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


संबंधित इतर बातम्या : 


सावधान! रात्री उशिरापर्यंत जागरण पडेल महागात, लवकर मृत्यू होण्याचा धोका; संशोधनात 'ही' धक्कादायक बाब उघड