Health Tips : अनेकदा आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, आपण घेत असलेल्या आहाराची काळजी घेतो. मात्र, निरोगी जीवनशैलीसाठी आणि उत्तम आहारासाठी तुमचे दातही तितकेच स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. अनेकदा आपण आपल्या किडलेल्या दातांकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच, पर्यायी तो दातही काढून टाकावा लागतो. पण, दात किडूच नयेत यासाठी त्याचा बचाव कसा करायचा? दात निरोगी राहावेत यासाठी काय करणं गरजेचं आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.    


दातांना कीड लागणार नाही याबद्दल आपण काय काळजी घेऊ शकतो यासाठी काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. या संदर्भात सांगताना डॉ. प्रवीण क्षीरसागर, डेंटल सर्जन, बीडीएस (मुंबई) सांगतात की, प्रत्येकाने दोन वेळा म्हणजेच सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वत:चे दात ब्रश केलेच पाहिजेत. कारण या ब्रशिंगमुळेच दातांची कीड थोपवता येते. काहीही खाल्ल्यानंतर ताबडतोब जर तुम्ही चूळ भरली तर दात किडण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकतं. 


दातांच्या कॅव्हिटीपासून कसा बचाव कराल?


लहान मुलांसाठी जशी फ्लोराईड अॅप्लिकेशन निघाली आहेत म्हणजेच मुलांचे जे नवीन दात येतात त्या दातांना फ्लोराईडचं अॅप्लिकेशन डेंटिस्टकडून जर करून घेतलं तर दात किडण्याचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं. या काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. त्याचबरोबर तुमचा नियमित डेंटल चेकअप फार महत्वाचा आहे. दर सहा महिन्यांनी तुम्ही जर डेंटिस्टकडे जाऊन तुमच्या थोड्याफार प्रमाणात किडलेल्या दातांवर लक्ष दिलं तरीदेखील तुमचा दात वाचू शकतो. 


दात काढणे हा दात किडीवर कायमचा उपाय असू शकतो का? 


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दात किडायला जर सुरुवात झाली असेल तर 'नंतर' हा शब्द तुमच्या कोषातून काढून टाका. कारण छोटासा किडलेला दात एका सेटिंगमध्ये भरून डेंटिस्ट तुम्हाला मोकळे करू शकतात. हेच प्रमाण जर वाढत गेलं तर पुढच्या प्रक्रिया जसे की, रूट कॅनल करणे. जर त्यानेही दात नाही वाचला तर तुम्हाला तो दात काढून टाकावा लागतो. त्यामुळे दात वाचवणं हे तुमचं कर्तव्य आहे. एक दात काढल्यानंतर मग ती श्रृंखला सुरु होते. पुढे कॉम्प्लिकेशन वाढत जातात. त्याच्यामुळे दातांची काळजी घेणं गरजेचं आहे. 


निरोगी दातांसाठी काय कराल? 



  • काहीही खाल्ल्यानंतर स्वच्छ गुळण्या करा. 

  • दोन वेळा दातांचं ब्रशिंग करा. 

  • तुमचा आहार पौष्टिक ठेवा. 

  • साखर आणि साखरेचे पदार्थ जितके कमी करता येतील तितके कमी करा. 

  • नियमितपणे तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन तुमच्या दातांची तपासणी करून घ्या. 


पाहा व्हिडीओ : 



महत्त्वाच्या बातम्या : 


Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते? यावर उपाय काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला