Beer Bottle Expiry Date: बिअर (Beer) किंवा दारू (Alcohol) पिताना लोक अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कधी कुठे पार्टीचं (Party) आयोजन झालं तर लोक वाईन शॉपमध्ये (Wine Shop) जातात आणि काहीही चेक न करता तसाच बिअरच्या बाटल्यांचा बॉक्स उचलून आणतात. यानंतर प्रत्येकाला ती बिअर बॉटल दिली जाते आणि तेही काहीच चेक न करत बॉटल तोंडाला लावतात, परंतु असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. एक बिअर तुमची अख्खी पार्टी खराब करू शकते. जर तुम्ही बिअरवर लिहिलेली एक गोष्ट नीट पाहिली नाही, तर ही छोटीशी चूक तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते.


जुनी बिअर ठरू शकते धोकादायक


बरेच लोक एक्स्पायरी डेट (Expiry Date) न तपासता बिअर पितात. बिअरच्या बाटल्यांवरही एक्स्पायरी डेट असते हे अनेकांना माहिती नसतं. काही ठिकाणचे विक्रेते त्यांच्याकडे असलेला बिअरचा साठा (Beer Stock) संपवण्यासाठी जुन्या बिअरची विक्री करतात, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं.


एक्स्पायरी डेट संपलेली बिअर विकण्यासाठी दारू विक्रेतेही अनेक आकर्षक ऑफर देतात. म्हणूनच जर तुम्हाला कधी कमी पैशांत बिअर (Cheap Beer) मिळत असेल किंवा एकावर एक मोफत बिअर (Buy 1 Get 1) मिळत असेल, तर सर्वात आधी त्याची एक्स्पायरी डेट (Expiry Date) तपासून घ्या. जर बिअरची मुदत संपली असेल तर अशी बिअर अजिबात घेऊ नका आणि त्याबद्दल तक्रारही करा.


कशी खराब होते बिअर?


बिअरमध्ये 4 ते 8 टक्के अल्कोहोलचं प्रमाण असते. उरलेल्या भागात बार्ली (Barley) आणि इतर प्रकारचं पाणी असतं. अल्कोहोलपेक्षा हे अन्य घटक लवकर खराब होतात. साधारणपणे बिअर 6 महिन्यांत खराब होते, म्हणूनच बिअरचं सेवन 6 महिन्यांच्या आतच केलं पाहिजे.


जर तुम्ही बिअरचं झाकण उघडलं असेल, तर ती लगेच प्यावी, कारण त्याची चव काही तासांनी खराब होते. तसेच खुल्या बिअरमध्ये बॅक्टेरिया वैगेरे जाण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पार्टी करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या.


एक्स्पायरी डेट संपलेली बिअर प्यायल्यास काय होईल?


बिअर पिण्यापुर्वी बिअरची गुणवत्ता तपासली पाहिजे. एक्स्पायरी डेटसह तिचा रंग, फेस, वास आणि चव याकडेही लक्ष दिलं पाहिजे. एक्स्पायरी डेट निघून गेलेली बिअर हानिकारक आहे, कारण त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. कालांतराने बिअर विषारी पदार्थ सोडतात, ज्यामुळे विषबाधा आणि इतर गंभीर परिणाम होऊ शकतात.


हेही वाचा:


VIDEO: स्वर्गाची शिडी चढायला चालला होता 'हा' माणूस; डोंगरावरुन पाय घसरला अन् 300 फूट खाली कोसळला