Health Tips : मधुमेह (Diabetes) ही एक फार गंभीर समस्या आहे. भारतात अनेकजण मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत. एका संसोधनानुसार असे दिसून आले की, जवळपास 101 मिलियन भारतीय मधुमेहाची समस्या आहे तर 136 मिलियन भारतीयाना प्री-डायबेटिजचा त्रास आहे. 


मधुमेहामुळे हार्ट डिजीज, हार्ट फेलियर आणि इतर अनेक प्रकारचे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधुमेहाचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या किडनीवर होतो. मधुमेह झाल्यानंतर किडनीचा त्रास होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात होतो. जवळपास तीनपैकी एक व्यक्ती किडनी संबंधित आजाराने त्रस्त आहे. 


जर तुम्ही मधुमेहाचे रूग्ण असाल तर वाढत्या साखरेच्या पातळीमुळे तुमची किडनी खराब होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. जर, तुम्हाला तुमची किडनी खराब होऊ नये असं वाटत असेल तर या ठिकाणी आमम्ही तुम्हाला काही उपाय सांगितले आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. 


किडनीवर मधुमेह कसा परिणाम करतो?


मधुमेहामध्ये क्रोनिक किडनी रोगचा धोका असतो. हाय ब्लड शुगर लेव्हल किडनीच्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. ब्लड प्रेशर किडनीच्या आतील भागातील नाजूक रक्तवाहिन्यांवर दबाव टाकू शकतात. यामुळे तुमची किडनी अधिक खराब होऊ शकते. या व्यतिरिक्त मधुमेहाच्या रूग्णांमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असतो. 


मधुमेहात किडनी खराब होण्याची लक्षणं 




मधुमेहानंतर किडनीचा आजार तसा सुरुच होतो. याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. जसजसा तुमचा आजार वाढतो तसतसा व्यक्तींमध्ये पायांना सुज येणे, धाप लागणे, सांध्यांचं दुखणं , मेटाबॉलिक एसिडोसिस यांसारखे एलेक्ट्रोलाईट आजार, ब्लड प्रेशर सांरखी लक्षणं दिसू लागतात. अनेक लोकांना ही लक्षणं फारशी कळत नाहीत. 


आहाराकडे लक्ष द्या 




तुमचा ब्लड प्रेशर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही हाय सोडिअम आणि हाय पोटॅशिअमसारख्या खाद्यपदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. प्रोटीनचं सेवन कमी करा कारण यामुळे तुमच्या किडनीवर दबाव पडू शकतो. 


व्यायाम करा 




रोज व्यायाम केल्याने इंसुलिन रेसिस्टेंटमध्ये बदल होतो. आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच, किडनीचा आजार सीकेडी मॅनेज करण्यात मदत मिळते. 


ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवा




मधुमेहामुळे रक्त वाहिन्या फार कडक होतात. यामुळे तुमचा बीपी वाढतो. यामुळे रक्त वाहिन्यांना फिल्टर करण्यासाठी आणि किडनीपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्त्व पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होते. यासाठी बीपीच्या गोळ्या नियमित घ्या. 


कोलेस्ट्रॉल कमी करा 




मधुमेहामुळे खराब कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या फार वेगाने वाढतात. मधुमेहाचा परिणाम लिपिड प्रोफाईल, हृदय, डोकं आणि किडनीसह शरीरातील इतर अवयवांवर होतो. मधुमेही रूग्णांना किडनी खराब होण्यापासून वाचण्यासाठी ग्लुकोज आणि बीपी नियंत्रित राखण्याबरोबरच कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. 


वजन कमी करा 




तुम्हाला जर किडनीचा आजार होऊ नये असं वाटत असेल तर तुमचं वजन नियंत्रित असणं गरजेचं आहे. यासाठी तुमच्या डाएटवर लक्ष द्या.तसेच, शारिरीक व्यायाम करा. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय