Health Tips : टाचांत दुखणे (Chronic Heel) ही आता सामान्य बाब झाली आहे. पण, ही समस्या जरी सामान्य असली तरी यापासून होणाऱ्या वेदना फार त्रासदायक असतात. टाचांमध्ये वेदना टाचांच्या खाली किंवा टाचेच्या मागे जाणवू शकते. काही लोकांमध्ये, ही वेदना संपूर्ण पायापर्यंत पसरते. आपल्याला टाचदुखी होण्यामागे इतर अनेक कारणं असू शकतात. पण, प्रामुख्याने फ्लॅट शूज आणि वाईट दर्जाच्या चप्पल हे यामागचं कारण असू शकतं.
पायाचे सर्वात लांब हाड आपल्या टाचेमध्ये असते. त्यामुळे आपल्या शरीराचा बराचसा भार त्यावर अवलंबून असतो. टाचदुखीच्या या समस्येवर आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, टाचांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही उपाय करून तुम्ही या समस्येवर मात करू शकतात. आणि दुखणाऱ्या वेदनेपासून सुटका मिळवू शकता. पण, ही टाचदुखी नेमक्या कोणकोणत्या कारणांमुळे होते हे जाणून घेऊयात.
टाचदुखीची कारणे
- तुम्ही फ्लॅट शूज किंवा खराब दर्जाचे शूज घातले असल्यास, ते तुमच्या टाचांना नीट सपोर्ट न केल्यामुळे तुम्हाला वेदना होऊ शकतात.
- जास्त वेळ उभे राहिल्याने देखील टाचदुखी होऊ शकते.
- कधी कधी दुखापत किंवा जखमांमुळे टाचांमध्ये वेदना होऊ शकतात.
सॉफ्ट शूज घाला
चुकीचे शूज परिधान केल्यामुळेही अनेकांना टाचांच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर त्यांना योग्य, सॉफ्ट शूज घालण्याचा सल्ला देतात. तुम्ही दिवसभर उभे राहिल्यास पायांना आराम देणारे आरामदायक शूज घालण्याचा प्रयत्न करा.
कोमट पाण्याने पायांना शेक द्या
टाचदुखीच्या समस्येवर कोमट पाण्याचा शेक दिल्याने पाय दुखण्यापासून आराम मिळू शकतो. यामुळे स्नायूंना आराम मिळतो. यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घेऊन पायांना 15 ते 20 मिनिटं शेक द्या.
मालिश करा
टाचदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मालिश देखील करू शकता. यासाठी 50 मिली गुलाबाचे तेल, 50 मिली मोहरीचे तेल आणि थोडा कापूर घ्या. ते मिक्स करून या तेलाने मालिश करा. तुम्हाला काही वेळातच फरक जाणवेल. यांसारखे उपाय केल्याने तुम्ही टाचदुखीसारख्या समस्येवर आराम मिळवू शकतात. त्यामुळे सर्वात प्रभावी उपाय म्हणजे चांगल्या प्रतीने शूज, सॅंडल वापरा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.