Health: रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी हितकारक समजले जाते. पण एका गोष्टीबद्दल कदाचित तुम्हाला माहित नसेल, की तुम्ही रात्री पाय धुवून झोपता का? बरेच लोक हे करणे विसरतात, अनेकदा लोक आपल्या आळशीपणामुळे असं करणे टाळतात, दररोज घाणेरडे पाय घेऊन झोपतात. तुम्हाला माहित आहे का? पाय धुणे हे केवळ स्वच्छतेशी संबंधित नाही तर ते तुमच्या आरोग्याशी आणि जीवनशैलीशीही संबंधित आहे. विविध गंभीर आजारांपासून तुमचं रक्षणही होतं. कसं ते जाणून घ्या..


 


रात्री पाय धुवूनच का झोपावे?


आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जेव्हा तुम्ही पाय न धुता झोपता, तेव्हा तुमच्या संपूर्ण शरीरावर ताण येतो, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. याउलट झोपण्यापूर्वी पाय धुतले तर त्याचा झोपेवर चांगला परिणाम होतो. अनेकदा आपले पाय हे एखाद्या चुंबकाप्रमाणे काम करतात, यामुळे चालताना जमीनीवरील जीवाणू पायाला चिकटून राहतात, ज्यामुळे घाम येऊ शकतो. जर तुम्ही दमट हवामानात राहत असाल आणि खूप चालत असाल, विशेषत: चप्पल घातली तर तुमच्या पायावर बरीच घाण आणि रस्त्यावरील धूळ साचू शकते. यामुळे तुमचे पाय गरम राहतात.


 


रात्री पाय धुतल्यानंतर झोपण्याचे फायदे-


चांगली झोप


जेव्हा तुम्ही तुमचे पाय गरम किंवा थंड पाण्याने धुता, तेव्हा ते तुमच्या शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करू शकते. विशेषतः जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी तुमचे पाय थंड पाण्याने धुता. तेव्हा थंड तापमान हे एक संकेत आहे, जे तुमच्या मेंदूला झोपेची वेळ जवळ येत असल्याचे सांगतात. यामुळे तुम्हाला चांगली झोप येते.


तणाव कमी होतो


अशा प्रकारे पाय धुतल्यानंतर झोपल्याने तुमचा स्नायूंचा ताण तसेच मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला बरे वाटते आणि तुमच्या सर्व चिंता विसरता येतात. त्यामुळे या सर्व टिप्सचा अवलंब करा आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय पूर्णपणे स्वच्छ करा. पुरेशी झोप घेतली की पुढचा दिवसही चांगला जाईल.


 


हेही वाचा>>>


Women Health: बाई...! घट्ट कपडे घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो? काय हा प्रकार? समज-गैरसमज जाणून घ्या...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )