Health: ज्याप्रमाणे जीवनशैलीत काळानुसार बदल होत चाललेत. त्याचप्रमाणे लोकांनी देखील आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बरेच मोठे बदल केले आहेत. सध्या फॅशनच्या नावाखाली मद्यपान करणं ट्रेंड समजलं जातं. एखादी सुखाची किंवा दु:खाची बातमी असू द्या, किंवा पार्टी, वाढदिवस, लग्न, अशा प्रकारच्या कोणत्याही प्रसंगी लोक दारू पितात, तर काही लोकांना रोज दारू पिण्याची सवय असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत पुरुषांसोबत महिलांचाही समावेश आहे, असे काही लोक आहेत, जे दररोज 1-2 पेग पितात. पण आठवड्यातून नेमकं किती अल्कोहोल घेतलं पाहिजे? आरोग्यावर काय परिणाम होतात? ते जाणून घेऊया.  



मृत्यूचा धोका 10 पटीने वाढतोय


सर्वांनाच हे माहित आहे की, दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र अनेकांकडून दारूचे सेवन काही थांबत नाही. अनेकांना वीकेंडला मित्रांसोबत आणि ऑफिसनंतर सहकाऱ्यांसोबत दारू पिण्याची सवय असते. असे काही लोक आहेत, जे दररोज 1-2 पेग पितात. काही लोक दररोज 1-2 पिंट बिअर किंवा काही ग्लास वाईन पितात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक एका आठवड्यात 14 युनिटपेक्षा जास्त अल्कोहोल पितात, त्यांच्या मृत्यूचा धोका 10 पटीने वाढतो. या लोकांना कर्करोग, हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते.आठवड्यातून 14 युनिट अल्कोहोल प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात ते जाणून घेऊया.



14 युनिट अल्कोहोल किती आहे?


14 प्रत्येक प्रकारच्या पेयानुसार अल्कोहोलची संख्या बदलू शकते. उदाहरणार्थ:- अल्कोहोलचे 14 युनिट्स बिअरच्या अंदाजे 6 पिंट्सच्या बरोबरीचे असतात. 10 ग्लास वाइन 14 युनिट्सच्या बरोबरीचे आहे. तथापि, डॉक्टरांच्या मते, बिअरचा एक पिंट देखील तुमच्या यकृताला हानी पोहोचवण्यास सक्षम आहे आणि कर्करोगाची शक्यता वाढवते.



संशोधनात काय आढळले?


या संशोधनानुसार, लोक दर आठवड्याला 14 युनिट्सपेक्षा जास्त अल्कोहोल पीत आहेत, एवढी दारू पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. कार्यालयातील ताणतणाव आणि विषारी कार्यसंस्कृतीमुळे लोक रोज दारू पितात असे या अहवालात म्हटले आहे. तरुण लोक प्रत्येक वीकेंड मित्रांसोबत पार्टी करताना किंवा मॅच पाहताना असंख्य पिंट बिअर पितात. जे या लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. संशोधकांनी सांगितले की, दिवसातून एक बिअर देखील जीवनासाठी हानिकारक आहे. या यादीत धूम्रपानाचाही समावेश आहे.



दिवसातून 1 ग्लास वाइन पिणे किती धोकादायक?


संशोधकांच्या मते, रोज 1 ग्लास वाइन प्यायल्याने कर्करोग होऊ शकतो. दररोज मद्यपान केल्याने यकृतावर परिणाम होत आहे. दररोज मद्यपान केल्याने स्मृतिभ्रंश होऊ शकतो. त्यामुळे टाइप-2 मधुमेह, ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अशा अनेक धोक्यांचाही संशोधनात समावेश करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, जे लोक यापेक्षा जास्त म्हणजेच आठवड्यातून 25 ते 30 युनिट अल्कोहोल पीत आहेत, त्यांनी ताबडतोब त्यांची सवय सुधारणे आवश्यक आहे, अन्यथा कधीही काहीतरी होऊ शकते. संशोधकांनी असेही नमूद केले आहे की 2018 मध्ये एवढी दारू प्यायलेल्या लोकांच्या मृत्यूची संख्या 40,000 असेल.


 


हेही वाचा>>>


Women Health: महिलांनो..तुमच्या 'या' सवयी आताच सोडा! ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतोय, डॉक्टरांनी सांगितले...


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )