Food Allergy Awareness Week: आपण काय खातो आणि आपले शरीर ते कसे पचवते, या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्याशी संबंधित असतात. पण काही वेळा काही गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्याला खाज आणि पुरळ येण्यासारख्या समस्या जनावतात. त्यामुळे काही वेळा आपल्याला काही गोष्टी पचत नाहीत आणि पोटदुखी आणि मळमळ जाणवू लागते. या दोन्ही परिस्थिती फूड अ‍ॅलर्जी आणि फूड इंटॉलरन्सची लक्षणे आहेत. बहुतेक लोकांना फूड अ‍ॅलर्जी आणि फूड इंटॉलरन्स यातील फरक माहित नाही आहे. मात्र आपण फूड अ‍ॅलर्जी जागरूकता सप्ताह निमित्त यातील फरक जाणून घेणार आहोत. 


फूड इंटॉलरन्स (Food Intolerance)


फूड इंटॉलरन्समुळे शरीर काही पदार्थांविरूद्ध असहिष्णुता दर्शवते आणि ते पदार्थ पचण्यास अवघड जातात किंवा पचत नाही. यामध्ये आपले पोट देखील रिऍक्ट करते. पण आहारतज्ञ किरण दलाल यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यानुसार यामध्ये बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ, अनेक वेळा तुम्हाला फूड इंटॉलरन्स असलेल्या गोष्टी थोड्या प्रमाणात घेतल्याने काही फरक पडत नाही, तर जास्त प्रमाणात घेतल्याने तुम्ही आजारी पडू शकता. याचेही वेगवेगळे प्रकार आहेत.



  • Lactose Intolerance : ज्यामध्ये शरीर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पचवू शकत नाही. 

  • Gluten Intolerance : ग्लूटेन असलेले पदार्थ, जसे की गहू, बार्ली आणि भातात आढळणारी प्रथिने, शरीर पचवू शकत नाही. 

  • Fructose Intolerance मध्ये शरीर फळे किंवा रस यांसारखे Fructose समृद्ध अन्न पचवू शकत नाही.


त्याचप्रमाणे काही लोकांमध्ये कॅफीन इंटॉलेरेंस, सॅलिसिलेट्स आणि आंबलेल्या पदार्थांचे इंटॉलेरेंस असू शकते. या दरम्यान शरीरात फूड इंटॉलरन्सची लक्षणे दिसतात. काही लोकांना या गोष्टी खाल्ल्याबरोबर शरीरात या समस्या दिसू शकतात. यातच मळमळ, पोटदुखी, गॅस, पुरळ येणे, डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवतात. 


फूड अ‍ॅलर्जी (Food Allergy)


फूड अ‍ॅलर्जी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करते, जी नंतर तुमच्या शरीराच्या इतर भागावर परिणाम करते. काही प्रकरणांमध्ये फूड अ‍ॅलर्जी गंभीर रूप  घेऊ शकते. यामध्ये अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. यातच फूड इंटॉलरन्स फार गंभीर नसून यात केवळ पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. फूड अ‍ॅलर्जी दरम्यान शरीरात हिस्टामाइनसारखे रसायन बाहेर पडतं. यामुळे खोकला, उलट्या, पोटदुखी, सूज येणे आणि रक्तदाब कमी होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.


प्रतिबंधात्मक उपाय


आहारतज्ज्ञ किरण दलाल सुचवतात की, ज्या लोकांना फूड अ‍ॅलर्जी आणि फूड इंटॉलरन्सची समस्या आहे, त्यांनी प्रथम अ‍ॅलर्जी टेस्ट आणि इंटॉलरन्स टेस्ट करून घ्यावी. जेणेकरून त्यांच्यासाठी कोणते अन्न चांगले आहे आणि कोणते खाणे योग्य नाही, हे त्यांना आधीच कळेल.