Heart Failure Symptoms | Heart Attack Symptom : बदलती जीवनशैली आणि बेडरेस्ट लाईफस्टाईलमुळे सध्या हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढलं आहे. गेल्या 2 वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे शरीर तंदुरूस्त ठेवत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. याचाच अर्थ जेव्हा हृदयात काही बिघाड होतो तेव्हा ते शरीराला सिग्नल देतं. यापैकी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे यावेळी तुमच्या हृदयात वेदना जाणवू लागतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागात दुखत असेल तर समजून घ्या की हृदयात काहीतरी गडबड सुरू आहे. दुखण्यामागे इतर कारणे असू शकतात असे डॉक्टर सांगत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. तर नेमक्या कोणत्या कारणामुळे त्रास होतोय हे समजून घेणे गरजेचे आहे. 


Heart Attack Symptom: 'या' वेदनांमधून हृदय सिग्नल देऊ शकतं


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, छातीत दुखणे हे हृदयाच्या अडथळ्याचे एक सामान्य लक्षण आहे, परंतु याशिवाय शरीरात इतर ठिकाणीही वेदना जाणवू शकतात. खांद्याच्या डाव्या आणि उजव्या हातात वेदना,  ओटीपोटात दुखणे, मानेत आणि छातीत कळा येणे यांसारखी जर कोणती लक्षणं दिसली की हृदयात काहीतरी गडबड सुरु आहे. डॉक्टर सल्ल्यानुसार, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये.


Heart Attack Symptom : घाम येत असेल, धाप लागत असेल तर डॉक्टरांकडे सल्ला घ्या


छाती, खांदा, कंबर कुठेही हृदयदुखीचा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टर सांगतात. जर पाठदुखी असेल आणि श्वासोच्छवासाचा त्रास, थकवा आणि घाम येत असेल तर ते कार्डिएक अरेस्टचे लक्षण असू शकते. म्हणून, असे झाल्यास, आपण ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. 


Heart Attack Symptom : महिलांनो अधिक सतर्क राहा


हृदयविकाराचा झटका कोणत्याही स्त्री-पुरुषाला येऊ शकतो. कोणत्याही वयात होऊ शकतो आणि कधीही होऊ शकतो. पण अभ्यासातून असे समोर आले आहे की, जर पाठदुखीचा त्रास पुरुष आणि महिला दोघांना होत असेल तर महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अशा स्थितीत पाठदुखीचा त्रास होत असताना महिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे. त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.


Heart Attack Symptom : हृदयविकाराचा झटका आणि कार्डिएक अरेस्ट


हृदयविकाराचा झटका आणि कार्डिएक अरेस्ट यामध्ये थोडा फरक आहे. जेव्हा हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह नीट वाहू शकत नाही. त्यामुळे रक्तपुरवठ्यासाठी हृदयावर दबाव वाढतो आणि त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होतात. हा हृदयविकाराचा झटका आहे. तर, कार्डिएक अरेस्टमध्ये हृदय एकत्र काम करणे थांबवत नाही, परंतु काही कारणास्तव हृदयाकडे जाणाऱ्या धमन्यांमधील रक्तप्रवाह थांबला तर हृदयविकाराचा झटका येतो. यामध्ये ती व्यक्ती लगेच बेशुद्ध होऊन जमिनीवर पडते. हृदय काम करणे थांबवते. जर त्या व्यक्तीला लवकर उपचार मिळाले नाहीत तर अचानक कार्डिएक अरेस्टने त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :