Health: जगप्रसिद्ध तालवादक झाकीर हुसैन (Zakir Hussain) आता आपल्यात नाहीत. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. काही बातम्यांनुसार, प्रसिद्ध संगीतकार लंग फायब्रोसिस (Lung Fibrosis) नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होते, जो फुफ्फुसांशी संबंधित आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा एक गंभीर आजार आहे. जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. ही अशी लक्षणं आहेत. ज्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. ज्याचा नंतर गंभीर परिणाम भोगावा लागतो. म्हणूनच या आजाराची सुरूवातीची लक्षणं आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जी वेळीच ओळखणं गरजेचं आहे.  


फुफ्फुसाच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ


फुफ्फुस हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या तुमच्या श्वासावरही परिणाम करू शकते. आजकाल फुफ्फुसाचे आजार खूप वाढले आहेत. झाकीर हुसैन यांना फुफ्फुसातील फायब्रोसिसचा त्रास होता. या आजाराची सुरुवातीची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया.


झाकीर हुसैन कोणत्या आजाराने ग्रासले होते?


झाकीर हुसेन यांना लंग फायब्रोसिस या आजाराने ग्रासले होते, जो फुफ्फुसाचा एक गंभीर आजार आहे. या आजारात श्वास घेण्यास त्रास होतो.






फुफ्फुसातील फायब्रोसिस म्हणजे काय?


फुफ्फुसातील म्हणजेच लंग्ज फायब्रोसिस या आजाराला पल्मोनरी फायब्रोसिस असेही म्हणतात. हा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसांच्या वायु श्वासोच्छवासाच्या नळ्या सूजतात, ज्यामुळे फुफ्फुसाच्या ऊती कठीण होतात. कालांतराने, हा कडकपणा वाढू शकतो आणि फुफ्फुसाच्या कार्यावर परिणाम करू शकतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. झाकीर हुसेन या आजाराने त्रस्त होते. जर वेळेवर उपचार केले गेले तर पुनर्प्राप्ती होऊ शकते परंतु थोडासा विलंब देखील घातक ठरू शकतो.


फुफ्फुसातील फायब्रोसिसची सुरूवातीची लक्षणं


श्वास घेण्यात अडचण.
सतत कोरडा खोकला जो उपचारानंतरही सुधारत नाही.
सामान्य कामे करतानाही थकवा जाणवतो.
काही रुग्णांना छातीत जडपणा किंवा घट्टपणा जाणवतो.
कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे.
शारीरिक हालचाली करताना श्वास लागणे.
रात्री ताप आणि घाम येणे.


फुफ्फुसातील फायब्रोसिस कसा टाळाल?


धूम्रपान कमी करा.
हवेच्या प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे, 
त्यासाठी घराच्या आत एअर प्युरिफायर लावा आणि बाहेर मास्क वापरा.
हलका व्यायाम केल्याने फुफ्फुसाचे कार्य सुधारू शकते.
सकस आहार घ्या.
घरातील कोणी याआधी आजारी असेल, तर वेळोवेळी स्वतःवर उपचार करा.


हेही वाचा>>>


Health: रोज नाही, पण अधूनमधून मद्यपान करता? वीकेंडला अल्कोहोल सेवन करता? यकृतासाठी कितपत धोकादायक? तज्ज्ञ काय म्हणतात?


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )