Health: मद्यपान करणे आरोग्यासाठी किती हानीकारक आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. याच्या अतिसेवनाने यकृत खराब होऊन मृत्यू होण्याचाही धोका असतो. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत मद्यपान करणे एक फॅशन मानली जाते. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सगळेच अल्कोहोलचे सेवन करतात. इतकंच काय आजकाल स्त्रियाही संख्याही वाढत चाललीय. यकृत खराब होण्यामागे अल्कोहोलचे सेवन हे देखील एक प्रमुख कारण आहे. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळेच काही लोक आजकाल अधूनमधून किंवा वीकेंडला मद्यपान करतात. पण असे करणेही आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते किंवा नाही.. जाणून घ्या तज्ज्ञांकडून...


अल्कोहोलमुळे यकृताला नुकसान होऊ शकते


यकृत हा आपल्या शरीराचा एक अत्यावश्यक अवयव आहे, त्यात कोणत्याही प्रकारची बिघाड झाल्यास त्याचे नुकसान होऊ शकते. जीवनशैलीच्या सवयी देखील यकृत खराब होण्यास कारणीभूत आहेत, यामध्ये अल्कोहोल पिणे याचा समावेश आहे. अल्कोहोलमुळे आपल्या यकृताला खूप नुकसान होऊ शकते, यावर अनेक संशोधने झाली आहेत. तसेच, तज्ज्ञ देखील हे मान्य करतात. यकृत तज्ज्ञ डॉ. सिरीयक एबी फिलिप्स यांनी अलीकडेच सांगितले की, जर कोणी आठवड्यातून एकदाच दारू प्यायले तर काय होईल? 


तज्ज्ञ काय म्हणतात?


डॉ. सिरीयक एबी फिलिप्स यांनी X वर एक पोस्ट शेअर करताना सांगितले की, एकदा त्यांची भेट एका जोडप्याशी झाली, नवरा 32 वर्षांचा होता आणि तो वीकेंडला दारू प्यायचा. पत्नीचे वय स्पष्ट नाही पण तिने आयुष्यात कधी दारू प्यायली नव्हती, त्यांच्या किडनीचा फोटो शेअर करून त्यांनी फक्त एक दिवस दारू प्यायल्यास काय होते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 




1 दिवसासाठी सुद्धा मद्यपान केल्यास काय होईल? तज्ज्ञ सांगतात...


इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कावेरी हॉस्पिटल्सचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. श्रीनिवास बोजनापू सांगतात की, दारू प्यायल्याने यकृत खराब होते, जर तुम्ही मद्यपान केले नाही तर हा अवयव आपल्या चयापचयाची कार्ये पार पाडण्यास मदत करतो. अल्कोहोलच्या सेवनाने यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दारू पिण्यामागे काही कारणे आहेत, ज्यामुळे यकृताला अधिक नुकसान होते.



  • दारू पिणे मर्यादित करा

  • शरीरातील इतर एन्झाईम्सवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

  • जीवनशैलीचे घटक जसे की अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, धूम्रपान आणि मद्यपान.


यामुळे कोणते नुकसान होऊ शकते?



  • यकृताच्या कार्यामध्ये घट.

  • फॅटी यकृताचा धोका.

  • लिव्हर सिरोसिस, ज्यामध्ये यकृत आकुंचन पावू लागते.

  • यकृताची सूज.

  • यकृताचा कर्करोग.


दारू अजिबात पिऊ नये का?


यकृत निरोगी ठेवण्यासाठी दारू अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. 
अल्कोहोलचे सेवन यकृताच्या आजारांना कारणीभूत ठरतेच, शिवाय कर्करोगासारखे आजारही होतात. 


हेही वाचा>>>


Women Health: 'आलिया, शिल्पा, सोनम यांनी मूल झाल्यावर 'असं' काय खाल्लं? लगेच Fit कशा झाल्या?' अभिनेत्रींचा डाएट प्लॅन माहितीय?


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )