Health : आजकालच्या धकाधकाच्या जीवनात निरोगी राहणे म्हणजे एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही, कारण प्रदुषित हवामान, कामाचा ताण, वेळ मिळत नसल्याने व्यायामाचा अभाव, अशा अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलय. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, यापैकी एकावरही परिणाम झाला तर जगणं कठीण होऊन बसते, त्यामुळे निरोगी जीवनासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. यकृत हा आपल्या शरीरातील एक आवश्यक अवयव आहे, जो आपल्याला अनेक प्रकारे निरोगी बनविण्यात मदत करतो. हे आपल्या शरीरात रक्तातील विषारी पदार्थ काढणे, तसेच पचनास मदत करणे यासह अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करते. मात्र, झपाट्याने बदलत्या जीवनशैलीमुळे आपले यकृत खराब होऊ लागते. त्यालाच लिव्हर डॅमेज म्हणतात, ज्याच्या खुणा आपल्या चेहऱ्यावरही दिसू लागतात.


 


यकृत हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव


यकृत म्हणजेच लिव्हर हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हे आपल्या शरीरात अनेक महत्त्वाचे कार्य करते, जे आपल्याला निरोगी बनविण्यात मदत करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यकृत हा ओटीपोटातील एक मोठा अवयव आहे जो रक्त शुद्ध करण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण शारीरिक कार्य करतो. ही एक ग्रंथी मानली जाते, जी शरीरासाठी आवश्यक रसायने तयार करते. अशात यकृत निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु सध्याच्या काळात झपाट्याने बदलणारी जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे यकृत अधिकाधिक आजारी म्हणजेच लिव्हर डॅमेज होत आहे.


 


यकृताचा आजार वेळीच शोधून काढणे गरजेचे


याशिवाय काही आजारांमुळे आपल्या यकृतालाही हानी पोहोचू शकते. अशा परिस्थितीत यकृताचा आजार वेळीच शोधून काढणे गरजेचे आहे. यकृत खराब झाल्यामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. जेव्हा यकृत खराब होते, तेव्हा आपले शरीर अनेक संकेत देते, जे ओळखून यकृताशी संबंधित समस्या शोधल्या जाऊ शकतात. यकृत खराब झाल्याची काही चिन्हे केवळ शरीरातच नव्हे तर आपल्या चेहऱ्यावरही दिसतात. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार दिल्लीचे डॉक्टर डॉ. पुनित सिंगला यांनी या संकेतांबद्दल तपशीलवार सांगितलंय.


 


त्वचा पिवळसर होणे


यकृताच्या आजाराचे सर्वात स्पष्ट आणि प्रमुख लक्षण म्हणजे कावीळ. त्वचा आणि डोळ्यांचे पांढरे पिवळे पडणे. हे रक्तामध्ये बिलीरुबिन जमा झाल्यामुळे होते, जे यकृत खराब होण्याचे लक्षण आहे.


 


लाल तळवे


यकृताच्या आजारामुळे तळहातांमध्ये रक्तप्रवाह वाढल्याने त्वचा लाल होऊ शकते. हे लक्षण हाताच्या तळव्यामध्ये सर्वात प्रमुख आहे.


 


स्पायडर angiomas


या लहान रक्तवाहिन्या आहेत, ज्या कोळ्याच्या पायांसारख्या असतात, ज्या त्वचेच्या पृष्ठभागाजवळ आढळतात. त्या दिसायला कोळीसारख्या दिसतात. लिव्हर डॅमेज असल्यास, अँजिओमास म्हणजेच लाल ते जांभळ्या रंगाच्या खुणा तुमच्या त्वचेवर दिसतात.



सूज येणे


यकृताच्या नुकसानीमुळे शरीरात, विशेषत: चेहऱ्यावर द्रव जमा होऊ शकतो. यामुळे विशेषत: चेहरा आणि डोळ्यांच्या भागात.सूज  येऊ शकते. 



मुरुम किंवा इतर त्वचेच्या समस्या


यकृताचा आजार शरीरातील हार्मोन्स संतुलन आणि डिटॉक्सिफिकेशन प्रणालीमध्ये व्यत्यय आणू शकतो, परिणामी एक्जिमा किंवा मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.



खाज सुटणे किंवा त्वचेचा रंग बदलणे


यकृताच्या नुकसानीमुळे तुमच्या त्वचेमध्ये खाज सुटणे, जखम होणे किंवा त्वचेच्या रंगात सामान्य बदल यासह इतर बदल होऊ शकतात.


 


हेही वाचा>>>


Women Health : हिना खानला झालेला 'स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर' म्हणजे काय? 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? का वाढतोय हा जीवघेणा आजार?


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )