Women Health : टिव्हीवरील विविध मालिकांमधून अल्पवधीतच प्रसिद्ध झालेली अभिनेत्री, तसेच बिग बॉस फेम आणि अनेक वेब सीरिजमध्ये काम करणारी हिना खान (Hina Khan) सध्या 'ब्रेस्ट कॅन्सर' म्हणजे 'स्तनाच्या कर्करोगाने' (Breast Cancer) त्रस्त आहे. हिनाने शुक्रवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ही माहिती शेअर केली. दरम्यान, हिनाला ज्या स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरने ग्रासले आहे, तो आजार नेमका काय आहे? तसेच याची लक्षणं काय आहेत? हा जीवघेणा आजार वाढण्याची कारणं काय? जाणून घ्या सविस्तर...
'ही माझ्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती' - हिना खान
हिना खानने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ती स्टेज थ्री (Stage 3 Breast Cancer) ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त आहे. पोस्टमध्ये तिने लिहिलंय की, "मला काही महत्त्वाच्या बातम्या सर्वांसोबत शेअर करायच्या आहेत. मला स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. ही आव्हानात्मक परिस्थिती असूनही, मी सर्वाना आश्वस्त करू इच्छितो की मी ठीक आहे. मी मजबूत, दृढनिश्चय आणि या आजारावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. माझे उपचार आधीच सुरू झाले आहेत. यातून आणखी मजबूत होण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे."
स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक 'ब्रेस्ट कॅन्सर'
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एका अहवालानुसार स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. हा कर्करोग हा भारतातील स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या बहुतेक कर्करोगापैकी एक असून ज्याचे प्रमाण 28.2% आहे. जगभरात या कर्करोगामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतो. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जाणून घेऊया आणि ते टाळण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत.
स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय?
स्तनाचा कर्करोग ही स्तनाच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, सर्व महिलांनी नियमितपणे त्यांच्या स्तनांची तपासणी करत राहायला हवी. स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा काही असामान्य दिसल्यास त्याबाबत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.हिना खानने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, तिला स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर आहे. स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात, म्हणजेच स्टेज 3 मध्ये ही गाठ मोठी (5 सेमी किंवा त्याहून अधिक) होते. तसेच स्तनाच्या आजूबाजूच्या ऊतींमधील ही वाढ चिंताजनक मानली जाते. अशात या कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास, उपचार घेणे आणि जीव वाचवणे सोपे जाते.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
-स्तनात किंवा अंडरआर्ममध्ये गाठ
- दोन्ही स्तनांच्या आकारात बदल
- स्तनाग्रातून रक्तस्त्राव
- स्तनात खाज सुटणे
-स्तनाचा एक भाग जाड होणे किंवा सूज येणे
- स्तनाच्या त्वचेत जळजळ किंवा मंदपणा
- स्तनाग्र भागात किंवा स्तनामध्ये लालसरपणा किंवा चपळ त्वचा
- स्तनाग्र भागात वेदना
- स्तनाच्या आकारात किंवा आकारात कोणताही बदल
- स्तनाच्या कोणत्याही भागात वेदना
स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणाला?
- वृद्ध लोकांसाठी
- स्तनाच्या कर्करोगाचा इतिहास
- लहान वयात मासिक पाळी
- रजोनिवृत्ती
-रजोनिवृत्तीच्या लक्षणांसाठी हार्मोन थेरपी घेणे
- लठ्ठपणा
- दारू पिणे
हेही वाचा>>>
Women Health : शरीरात अत्यंत शांतपणे पसरतो 'हा' कर्करोग! महिलांनो.. चुकूनही 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )