Health : उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही आजच्या काळात एक सामान्य समस्या बनली आहे. मात्र तरुणांनाही याचा त्रास वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. याआधी वृद्धांमध्ये हाय बीपी दिसून येत होता, मात्र आता 20 वर्षांचे तरुणही याला बळी पडत आहेत. उच्च रक्तदाब ही आजकाल तरुणांमध्ये मोठी समस्या बनली आहे. 'कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया'च्या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक 5 तरुणांपैकी 1 तरुण हा उच्च रक्तदाबाचा बळी ठरत आहे. त्यानुसार भारतातील सुमारे 8 कोटी तरुण उच्च रक्तदाबाचे बळी आहेत. हा आकडा धक्कादायक आहे. आता हाय बीपीचे बळी तरुण का होत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी जाणून घेऊया डॉ. प्रणजित भौमिक, डायरेक्टर- इंटरनल मेडिसिन, एशियन हॉस्पिटल फरीदाबाद यांच्याकडून.


 


 पाश्चिमात्य तरुणांच्या तुलनेत भारतीय तरुणांना अधिक समस्या


उच्च रक्तदाब ही आजकाल तरुणांमध्ये मोठी समस्या बनली आहे. 'कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया'च्या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक 5 तरुणांपैकी 1 तरुण हा उच्च रक्तदाबाचा बळी ठरत आहे. त्यानुसार भारतातील सुमारे 8 कोटी तरुण उच्च रक्तदाबाचे बळी आहेत. हा आकडा अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा मोठा आहे. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीनुसार डॉ. कार्तिक गुप्ता (फिजिशियन, एम्स नवी दिल्ली) यांच्या मते, भारतीय तरुणांना पाश्चिमात्य तरुणांच्या तुलनेत उच्च रक्तदाबाची समस्या अधिक लवकर भेडसावत आहे. यामुळेच तरुण वयात हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात लक्षणीय वाढ झाली आहे. उच्च रक्तदाब हा एक धोकादायक आजार का आहे आणि सामान्य रक्तदाब शरीरासाठी का महत्त्वाचा आहे हे जाणून घ्या


 


रक्तदाब म्हणजे काय?


जसं की आपणा सर्वांना माहित आहे की दिवसाचे 24 तास डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरात रक्त वाहत असते. जेव्हा तुमचे हृदय धडधडते, तेव्हा ते रक्त पंप करत असते. पंपिंगमुळे संपूर्ण शरीरात रक्तवाहिन्या आणि धमन्यांमधून रक्ताचा संचार होतो. आता प्रश्न पडतो की शरीरात रक्त का वाहते? खरं तर, आपल्या शरीरातील सर्व अवयवांना कार्य करण्यासाठी भरपूर पोषक तत्वांची आवश्यकता असते. या पोषक तत्वांची पूर्तता करण्यासाठी, आपण दररोज अन्न आणि आरोग्यदायी गोष्टी खातो. परंतु हे पोषक घटक केवळ खाल्ल्याने आपल्या अवयवांचे पोषण होऊ शकत नाही. त्यामुळे शरीराचे इतर भाग आधी अन्न पचवतात आणि नंतर त्यातील पोषक आणि वाईट घटक वेगळे करतात. यानंतर, लघवी आणि विष्ठेच्या मदतीने शरीरातील सर्व वाईट घटक काढून टाकले जातात. आता शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक रक्ताद्वारे आपल्या अवयवांपर्यंत पोहोचवले जातात. जेव्हा हे रक्त आपल्या शरीरातून वाहते तेव्हा ते नसा आणि धमन्यांच्या कडांवर दबाव आणते. रक्तवाहिन्या आणि शिरा यांच्यावर पडणाऱ्या या दाबाला रक्तदाब म्हणतात. जर रक्तदाब खूप वाढला तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात, ज्यामुळे रुग्णाचा तात्काळ मृत्यू देखील होऊ शकतो.


या कारणांमुळे तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढतोय


आजकाल तरूणाई मुख्यतः पॅकबंद आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खातात. चिप्स, कुकीज, नगेट्स प्रमाणेच यामध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते, ज्यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो. जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्याने शरीरात पाणी साचते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो.


तणावामुळे शरीरातील हार्मोन्सचा स्राव वाढतो. हे हार्मोन्स हृदयाचे ठोके वाढवतात आणि रक्तवाहिन्या अरुंद करतात. ही स्थिती उच्च रक्तदाबाचे कारण बनते.


जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली राहिली तर शरीरात जळजळ होते. या सूजेमुळे रक्त वाहून नेणाऱ्या नसा खराब होतात, त्यामुळे त्या त्यांचे काम करू शकत नाहीत.


आजकाल बहुतेक लोक ऑफिसमध्ये 9 तास डेस्क जॉब करतात, यामुळे शारीरिक हालचाली कमी होऊ लागतात, त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो.



,कमी वेळ झोपणे, अति मद्यपान आणि सिगारेट यांसारख्या सवयींमुळेही रक्तवाहिन्या आकसतात, ज्यामुळे हाय बीपीची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.


जास्त वजन हे उच्च रक्तदाबासाठी एक प्रमुख कारण असू शकते. जास्त वजनामुळे तुमच्या हृदयावर अतिरिक्त ताण पडतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्याचा धोका वाढतो.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


 


Mother's Day 2024 : स्वत:चं दुखणं लपवत मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या आईला द्या निरोगी आरोग्याची भेट! 'मदर्स डे' बनवा खास, 'या' टेस्ट नक्की करा