Health: आजकाल बदलती जीवनशैली, कामाचा ताण अन् विविध जबाबदाऱ्यांमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी लोकांचं वजन वाढत चाललंय. त्यात झटपट वजन कमी करण्याच्या नादात लोक विविध प्रकारच्या टिप्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुरू करताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्याशी चक्क खेळ होतोय, याचा अंदाज त्यांनी नसावा बहुतेक.... लोक वजन कमी करण्यासाठी काहीही करत आहेत, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे जाणून घेतल्याशिवाय... झटपट वजन कमी करण्याच्या विविध प्रकारच्या युक्त्या दररोज सोशल मीडियावर शेअर केल्या जातात आणि दावे केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये एक महिला सांगतेय की, तिने फक्त पाणी पिऊन 14 दिवसात 9 किलो वजन कमी केले आहे. त्यामुळेच सध्या  Water Fasting म्हणजेच जल उपवासाची  बरीच चर्चा आहे



Water Fasting करून वजन कमी करणे कितपत योग्य आहे?


Water Fasting या प्रक्रियेला जल उपवास म्हणतात. अशा परिस्थितीत फक्त पाणी पिऊन वजन कमी करणं योग्य आहे का, त्यामुळे झटपट वजन कमी होतं का आणि काही तोटे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जल उपवास करण्याची पद्धत अजिबात योग्य नाही, कारण त्यात जास्त वेळ फक्त पाणीच प्यावे लागते. ज्यामुळे ग्लायकोजेनचा साठा आणि स्नायूंचे प्रमाण कमी होते. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. त्याचे अनेक तोटे आहेत, ज्यामुळे समस्या वाढू शकतात.


 


Water Fasting चे फायदे


ग्लायकोजेनची कमतरता आणि पाण्याच्या कमतरतेमुळे जलद वजन कमी होऊ शकते.
काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, अल्पकालीन पाण्याचा उपवास रक्तदाब नियंत्रण आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकतो.


 


Water Fasting चे धोके


मधुमेह आणि हृदयविकाराच्या रुग्णांनी पाण्याच्या उपवासापासून दूर राहावे.
गरोदरपणात कधीही जल उपवास करू नये, अन्यथा आई आणि बाळ दोघांचेही नुकसान होऊ शकते.


 


Water Fasting चे तोटे काय आहेत?


फक्त पाणी प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारे नुकसान होते. यामुळे काही प्रमाणात वजन कमी होऊ शकते, परंतु काही काळानंतर वजन देखील वेगाने वाढू लागते.
वजन कमी करताना पाणी पिणे फायदेशीर आहे परंतु जर तुम्ही आरोग्यदायी पदार्थ खात राहिलात तरच.
फक्त पाणी प्यायल्याने शरीराला अन्नातून मिळणारे द्रव मिळत नाही आणि हायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. 
यामुळे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता देखील होऊ शकते.
फक्त पाणी प्यायल्याने चक्कर येणे, थकवा येणे, अशक्तपणा येणे, डोकेदुखी आणि मूर्च्छा येणे अशा समस्या उद्भवू शकतात.


 


हेही वाचा>>>


Men Health: काय सांगता! लग्नानंतर पुरुषांचं केवळ खाण्यापिण्यानेच नाही, 'या' गोष्टीमुळे वजन वाढतं?एका संशोधनातून खुलासा! जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )