Health : आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे सेवन आणि व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे अनेक लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय. अशात एकीकडे जगभरात कर्करोगाचा धोका वाढतानाही दिसत आहे. विविध प्रकारच्या कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. फुफ्फुसाचा कर्करोग हे पुरुषांमध्ये सर्वाधिक नोंदवलेले कर्करोग आहेत तर स्त्रियांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची सर्वाधिक नोंद झाली आहे. शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोगाचा धोका असतो. मात्र सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, कर्करोगाचा धोका कोणाला जास्त आहे, पुरुष की स्त्री? अभ्यास काय सांगतो? जाणून घ्या...
पुरुष आणि स्त्रियांमध्ये कर्करोगाचा धोका कोणाला जास्त?
एका संशोधनात असे दिसून आले आहे की अनुवांशिकतेमुळे पुरुषांना स्त्रियांपेक्षा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेतील संशोधकांनी एका अभ्यासासाठी 171,274 पुरुष आणि 122,826 महिलांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. विश्लेषण असे सूचित करते की, धूम्रपान आणि अल्कोहोल सेवन, बॉडी मास इंडेक्स (BMI), शारीरिक अॅक्टीव्हीटी, आहार आणि वैद्यकीय इतिहास हे कर्करोगासाठी मुख्य जोखीम घटक असू शकतात, ज्यामुळे दोन्ही लिंगांसाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
अभ्यासात काय आढळले?
एका अभ्यासानुसार, बहुतेक प्रकारचे कर्करोग स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक वेळा विकसित होतात, खराब जीवनशैली आणि आहारातील चुकीच्या पद्धतीमुळे कर्करोगाचा धोका वाढताना दिसत आहे. अभ्यासाचे विश्लेषण असे सुचविते की, स्त्रियांपेक्षा पुरुषांना कर्करोगाचा धोका जास्त असण्यामागे अनेक घटक कारणीभूत असू शकतात. कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या अहवालात संशोधनाच्या प्रमुख लेखिका डॉ. सारा एस म्हणतात की, "आम्ही असे गृहित धरले की पुरुष आणि स्त्रियांमधील कर्करोगाच्या घटनांमध्ये फरक करण्यासाठी जीवनशैली हा एकमेव घटक विचार केला जात नाही, विविध घटक कारणीभूत ठरतात, संशोधकांनी मानवी शरीरातील 21 कर्करोगग्रस्त भागांचे मूल्यांकन केले. शेवटी, असे म्हटले आहे की कर्करोगाचा धोका आणि त्याचे गंभीर स्वरूप पुरुषांमध्ये जास्त असल्याचे दिसून आल्यांच संशोधकांनी स्पष्ट केलंय.
कर्करोगाचा धोका का वाढतो?
संशोधकांनी नोंदवले की, पुरुषांमध्ये यकृत, पित्त नलिका, त्वचा, गुदाशय आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांमधील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे कर्करोगाचा धोका जास्त किंवा कमी असू शकतो. हार्मोन्सची उच्च पातळी, पेशी वाढ देखील जोखीम दाखविण्यात आले आहे.
कर्करोग टाळण्यासाठी उपाय काय?
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी महिला आणि पुरुष दोघांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निरोगी जीवनशैली राखणे, सकस आणि पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तसेच कर्करोगासारख्या जुनाट आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी एक लस उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने या कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.
स्रोत आणि संदर्भ
Why are men at higher risk of cancer?
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो सतर्क राहा! Breast Cancer चे विविध टप्पे माहित आहेत? ते कशाप्रकारे शरीरात पसरतात? लक्षणं जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )