Health : पावसाळा हा शरीराला आणि मनाला आराम देणारा ऋतू आहे. पण हाच पावसाळा आल्हाददायक वातावरणासोबत विविध आजारही घेऊन येतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक या आजारांना अधिक वेळा बळी पडतात. योग्य काळजी आणि उपचार न मिळाल्याने काही आजार गंभीर बनू शकतात. मग जर या ऋतूचा आनंद घ्यायचाय, तेही आजारांना बळी न पडता.. यापासून दूर राहण्यासाठी काही खास योगासनांची मदत घेऊ शकता.
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवा...
सर्दी-खोकल्याचा वारंवार जेव्हा त्रास होतो, तेव्हा प्रत्येक वेळी बदलत्या हवामानाला दोष देणे योग्य नाही, तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती हे देखील याचे प्रमुख कारण असू शकते. कमी प्रतिकारशक्तीमुळे, शरीर सहजपणे किरकोळ आजारांना बळी पडते आणि कधीकधी योग्य उपचार आणि काळजी न मिळाल्याने हे गंभीर स्वरूप देखील घेतात. हंगामी आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये योगाचे काही खास प्रकार तुम्हाला मदत करू शकतात.
भुजंगासन
भुजंगासन योगाच्या सरावाने केवळ पोटाची चरबी आणि हनुवटीची अतिरिक्त चरबी कमी होत नाही, तर हे आसन तुमची पचनसंस्था मजबूत करते आणि रक्ताभिसरण प्रणालीला उत्तेजित करते. शरीराच्या अवयवांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचे योग्य परिसंचरण झाल्यास अनेक रोगांचा धोका कमी होतो. याशिवाय या आसनामुळे शरीराची लवचिकताही वाढते.
मत्स्यासन
मत्स्यासन हे झोपून केलेले आसन आहे आणि ते अनेक लाभांनी परिपूर्ण आहे. असे केल्याने पचनक्रिया निरोगी राहते. जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर हे आसन केल्याने देखील फायदा होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आसनाचा सराव केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. श्वासासंबंधीच्या समस्या दूर होतात. या आसनामुळे झोपेशी संबंधित समस्याही दूर होतात.
उत्तानासन
उत्तानासन हे देखील अनेक फायद्यांनी भरलेले आसन आहे. या आसनाच्या सतत सरावाने पोटाची चरबी झपाट्याने कमी होऊ लागते. याशिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. हे केस आणि चेहऱ्याची चमक देखील वाढवते. या आसनामुळे यकृत आणि किडनीमध्ये रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो. शरीर उत्साही राहते. मन शांत राहते, ज्यामुळे चांगली झोप लागते आणि तणाव दूर होतो.
हेही वाचा>>>
Employee Health : 21 ते 30 वयोगटातील कर्मचाऱ्यांना कामाचा सर्वाधिक ताण, तर पुरुषांपेक्षा महिला जास्त तणावग्रस्त, सर्वेक्षणातून माहिती समोर
(टीप : हा लेख वैद्यकीय अहवालांमधून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )