Health: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, व्यायामाचा अभाव आणि जंकफूडचे सेवन यासारख्या विविध गोष्टींमुळे लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय. अशात मधुमेह हा एक असा गंभीर आजार आहे, जो इतर अनेक गंभीर आजार देखील घेऊन येतो. जगातील लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. साखरेचा आजार हा आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींवर अवलंबून असतो. अनारोग्यकारक खाणे, तणावाखाली असणे, जास्त वजन वाढणे आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन करणे ही सर्वात मोठी कारणे आहेत. या आजारापासून आराम मिळणे सोपे नाही परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 सोप्या उपायांबद्दल सांगणार आहोत, जे आयुर्वेदिक आणि अगदी सोपे आहेत. स्वामी रामदेव यांनी मधुमेह नियंत्रित करण्यासाठीचे काही उपाय सांगितले आहेत. योगगुरू रामदेव त्यांच्या सोशल मीडियावर आरोग्याशी संबंधित व्हिडिओ आणि टिप्स शेअर करत असतात. एकदा पाहाच..





स्वामी रामदेव यांचे प्रभावी उपाय


मधुमेहामध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवावी लागते, जे सोपे काम नाही. स्वामी रामदेव यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये रक्तातील साखर संतुलित करण्याचे 3 सोपे मार्ग सांगितले आहेत. स्वामी रामदेव यांच्या व्हिडीओनुसार, या तीन टिप्स टाइप 1 मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिन घेण्यापासून वाचवू शकतात.






हर्बल ज्यूस - स्वामी रामदेव यांनी हर्बल पदार्थांपासून बनवलेला ज्यूस पिण्याचा सल्ला दिला आहे. हा रस तयार करण्यासाठी त्यांनी सदाहरित पाने, कारले, काकडी आणि टोमॅटो एकत्र करून ज्युसरमध्ये बारीक करून हेल्दी ड्रिंक बनविण्याचे सांगतात. स्वामी रामदेव सांगतात की, हा रस आणखी फायदेशीर बनवण्यासाठी तुम्ही त्यात आवळाही टाकू शकता. हा ज्यूस रोज प्यायल्याने शुगर नियंत्रणात राहते आणि शरीर डिटॉक्सही होते.


मेथीचे पेय- स्वामी रामदेव यांनी आणखी एका फॉर्म्युलामध्ये मेथीच्या दाण्यांचे सुपरहेल्दी पेय सांगितले आहे. ते बनवण्याचे 2 मार्ग आहेत, दोन्ही अगदी सोपे आहेत. प्रथम, तुम्ही 1 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते प्या. जर तुम्हाला काही गरम प्यावेसे वाटत असेल तर 1 ग्लास पाणी गरम करून त्यात मेथीदाणे टाका, उकळवून मग प्या.


कच्च्या हळदीची भाजी - तिसऱ्या फॉर्म्युलामध्ये त्यांनी एका भाजीचा उल्लेख केला आहे जी आजकाल खूप विकली जाते. ही भाजी म्हणजे कच्ची हळद. तूपात लसूण, आले आणि कांदा टाकून हळद बारीक करून त्यांनी भाजी तयार केली आहे. ही भाजी खाल्ल्याने शुगरही नियंत्रित राहते.


आणखी काय करू शकतो?


स्वामी रामदेव सांगतात की, साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक चिरायताची पाने तोंडात दाबून ठेवू शकता किंवा चावून खाऊ शकता. कोरफडीचे सेवन करू शकता. कडुलिंबाची पाने देखील खाऊ शकता.


हेही वाचा>>>


Men Health: आजकाल पुरुषांच्या स्तनांचा आकार का वाढतोय? काय आहे ही समस्या? कारण आणि उपाय जाणून घ्या


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )