Health : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय. अशात अनेकांना रक्तदाबाच्या समस्येच्या प्रमाणात देखील वाढ होताना दिसत आहे. रक्तदाबाचे देखील दोन प्रकार आहेत. एक म्हणजे High म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आणि दुसरे म्हणजे low ब्लड प्रेशर...रक्तदाब वाढणे जितके हानीकारक आहे, तितकेच कमी होणे देखील आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. कमी रक्तदाब म्हणजे रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब कमी होत आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, जर तुम्हाला लो बीपीची समस्या असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ही समस्या टाळण्यास मदत होईल.


 


शरीरातील रक्तदाब बदलत राहतो


ज्या दाबाने तुमच्या धमन्यांमधून रक्त वाहते त्याला रक्तदाब म्हणतात. तो दिवसभर सारखा राहत नाही. व्यायाम करताना, झोपताना आणि खाताना तुमच्या हालचालींनुसार रक्तदाब बदलत राहतो. याशिवाय जीवनशैली आणि आहारामुळे रक्तदाबही बदलतो. अशा परिस्थितीत आपण अनेकदा उच्च रक्तदाबाच्या समस्येबद्दल बोलतो, परंतु कमी रक्तदाबही तितकाच धोकादायक असतो आणि जर यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास मृत्यूही होऊ शकतो. म्हणूनच, आज आपण आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, कमी रक्तदाब (लो बीपी) ची समस्या कशी टाळता येईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. 


 


कमी रक्तदाब म्हणजे काय?


कमी रक्तदाबाला हायपोटेन्शन असेही म्हणतात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जेव्हा रक्तदाब 90/60 मिमी एचजी खाली येतो तेव्हा ही स्थिती उद्भवते. यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की खराब जीवनशैली, कोणताही आजार, कोणत्याही औषधाचे दुष्परिणाम इ. साधारणपणे, कमी रक्तदाबाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु जर रक्तदाब खूप कमी झाला असेल, तर काही वेळा चक्कर येणे, मूर्च्छा येणे अशी काही लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत कमी रक्तदाबाची लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधावा.


 


कमी रक्तदाब कसा नियंत्रित करायचा?


जर तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्या असेल तर काही टिप्सच्या मदतीने तुम्ही यापासून दूर राहू शकता.


 


आहारात मीठाचा समावेश 


जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते, परंतु ज्यांचा रक्तदाब कमी आहे त्यांनी आपल्या आहारात मीठाचे प्रमाण थोडे वाढवावे. यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. मात्र, यासाठीही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या की मीठ किती प्रमाणात सेवन करणे योग्य आहे, कारण मिठाचे प्रमाण खूप वाढले तर इतर समस्या निर्माण होऊ शकतात.


 


संतुलित आहार


रक्तदाब राखण्यासाठी, संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. आपल्या आहारात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि प्रथिने समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश करा. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासोबतच हे आरोग्यालाही अनेक फायदे देते.


 


अचानक उठू नका


काही लोकांना ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असतो, म्हणजे अचानक उभे राहिल्यास रक्तदाब काही सेकंदांसाठी कमी होतो. यामुळे चक्कर येते. त्यामुळे तुमची स्थिती अचानक बदलू नका.


 


व्यायाम करा


रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.


 


खूप पाणी प्या


शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या.


 


रक्तदाब तपासा


जर तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्या असेल, तर तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासा आणि काही समस्या असल्यास, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो सतर्क राहा! Breast Cancer चे विविध टप्पे माहित आहेत? ते कशाप्रकारे शरीरात पसरतात? लक्षणं जाणून घ्या


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )