Health : देशासह राज्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाने शरीराची लाहीलाही होत असतानाच आपण वाढत्या उष्णतेत गारवा मिळावा यासाठी अनेक विविध उपाय करतो. पण आता उष्णता टाळण्यासाठी अशा एका पानाचा वापर केला तर काम झालचं म्हणून समजा..! औषधी गुणांनी परिपूर्ण हे पान उन्हाळ्यात चक्क AC चं काम करेल.. जाणून घ्या...
विविध गुणधर्मांचे पॉवरहाऊस 'हे' पान!
गरमीमध्ये वरदान असलेलं हे पान पुदीन्याचं आहे.. बरं का.. पुदीना ही बहुतेक घरांमध्ये आढळणारी एक सामान्य औषधी वनस्पती आहे, जी त्याच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे. तसेच हे पान अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखली जाते. हे गुणधर्मांचे पॉवरहाऊस मानले जाते आणि त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. पुदिन्याच्या पानांचा सरबत, चटणी आणि हिरव्या भाज्यांच्या स्वरूपात वापर केल्यास उन्हाळ्यात उष्माघात होण्याची शक्यता शून्यावर येते. तसेच पुदिना, कांद्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात मिसळून पिल्याने कॉलरा होत नाही. त्याचप्रमाणे जिरे, काळी मिरी आणि हिंग मिसळून पुदिन्याचे सेवन केल्यास पोटदुखीपासून आराम मिळतो.
तज्ज्ञ काय म्हणतात?
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या औषधी वनस्पती विभागात काम करणारे तज्ज्ञ डॉ. दिनेश राय यांनी या संदर्भात माहिती दिलीय, ते म्हणाले.. पुदीना वनस्पती औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. दैनंदिन जीवनात या वनस्पतीच्या पानांचा वापर केला पाहिजे. याचा वापर केल्याने उन्हाळ्यात उष्माघात सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. एवढेच नाही तर कॉलरा, पोटदुखी यांसारख्या आजारांवर या वनस्पतीचे पान रामबाण औषध आहे. लोक हिरव्या भाज्या, कोशिंबीर आणि सरबतच्या रूपात देखील याचे सेवन करू शकतात. पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते आणि उष्माघात सारख्या समस्या टाळता येतात.
विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये वापर, मागणीत वाढ
माहितीनुसार, मेन्थॉल हा तेलाचा मुख्य घटक आहे. पुदीन्याच्या तेलात मेन्थॉल आणि मिथाइल ॲसिटेट सारखे घटक आढळतात. याच्या तेलामध्ये मेन्थॉलचे प्रमाण सुमारे 75-80 टक्के असते. पुदीन्याचे तेल पाठदुखी, डोकेदुखी आणि श्वसनविकारांवर औषधी बनवण्यासाठी वापरले जाते. याशिवाय सौंदर्यप्रसाधने, टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम लोशन, टॉफी, च्युइंगम, कँडी इत्यादी बनवण्यासाठीही याच्या तेलाचा वापर होतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये त्याचा वापर होत असल्याने त्याची मागणी वाढत आहे. ताज्या भाज्यांमध्ये तेलाचे प्रमाण 0.8-100 टक्के असते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Health : काय सांगता! 'ही' भाजी मटण-मच्छी पेक्षाही भारी? आरोग्यासाठी फायदेशीर, चवीची गोष्टच न्यारी! जाणून थक्क व्हाल..