Alcohol Facts: दारू पिणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. हे सर्वांना माहीत असले तरी लोक त्याचे सर्रासपणे सेवन करतात. असे काही लोक आहेत, जे दररोज सुद्धा दारू पितात. तर काही लोक असेही आहेत, जे खास प्रसंगीच दारू पितात. आजकाल दारू हे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी सामान्य झाले आहे. परंतु आरोग्यासाठी ते गंभीर मानले जाते. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की साधारणपणे पुरुष दररोज 2 ड्रिंक घेतात आणि महिला दररोज 1 ड्रिंक घेतात. अल्कोहोलचे सेवन कमी केल्याने स्ट्रोक आणि हृदयविकाराच्या झटक्याने होणारे मृत्यू कमी होतात, असेही या संशोधनात सांगण्यात आले. ही गोष्ट कितपत खरी आहे? जाणून घ्या..
अभ्यास काय सांगतो?
रिपोर्टनुसार, अल्कोहोलचे नियमित सेवन केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो. त्याच वेळी, कमी मद्यपान केल्याने इतर आजारांचा धोका कमी होतो असेही सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने केलेल्या या संशोधनावर WHO काय म्हणते? जाणून घ्या..
WHO काय म्हणते?
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, दारू पिणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, मग ते कितीही प्रमाणात सेवन केले जाते हे पाहणंही अत्यंत गरजेचं आहे. अल्कोहोलची कोणतीही पातळी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असू शकत नाही. तसेच, डब्ल्यूएचओ असेही म्हणते की अल्कोहोल हे सुरक्षित पेय नाही, म्हणून हेल्थ स्केलवर टाकणे योग्य होणार नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन देखील या वस्तुस्थितीला समर्थन देत नाही. सीडीसी डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही कमी मद्य प्यायले तर कमी नुकसान होईल पण हानी निश्चित आहे. त्याच वेळी, जे जास्त पितात, त्यांच्यासाठी तर अल्कोहोल अत्यंत हानिकारक आहे.
दारू पिण्याचे तोटे
दररोज मद्यपान केल्याने शरीरातील अनेक अवयव जसे की, यकृत, मूत्रपिंड आणि मेंदूचे नुकसान होते. मद्यपान केल्याने घसा, तोंड आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. जे लोक कमी दारू पितात, त्यांनाही या आजारांचा धोका असतो. या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो..पहाटेची 'ही' वेळ अत्यंत जीवघेणी, हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक, 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )