Solapur News : पुण्यात GBS ची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णावर सोलापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे चार विविध विभागाच्या डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलं आहे. या रुग्णाचा मृत्यू GBS मुळेच झाल्याची शंका शववि्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना होती. या शंकेचे निरसन करण्यासाठी मृतदेहाचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.  सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. संजीव ठाकूर यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. 


मृत्यू झालेला रुग्ण हा 40 वर्षांचा


मृत्यू झालेला रुग्ण हा 40 वर्षांचा होता. त्याला खासगी रुग्णालयातून मृत्यूनंतर आमच्याकडे पोस्टमार्टमसाठी आणले होते.  शवविछेदन ज्या डॉक्टरांनी केलं त्यांच्या प्राथमिक अहवालनुसार या रुग्णाचा मृत्यू GBS मुळे झाल्याचे समोर आले आहे. पण 100 टक्के खात्रीसाठी मेंदूतील, रक्ताचे नमुने, छोटे आणि मोठ्या आतड्याचे नमुने हे तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीचे अहवाल हे 8 दिवसात प्राप्त होतील. त्यावेळी gbs मुळे मृत्यू आहे का हे निश्चित होईल पण प्राथमिक दृष्ट्या gbs वाटत असल्याची माहिती डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. 


लवकर ट्रीटमेंट मिळाली नाही तरचं रुग्ण दगवू शकतो


या रुग्णाचे दोन्ही हात पाय निकामे झाले होते, श्वास घ्यायला त्रास होतं होता, त्यामुळं व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मृतदेह पहिल्यानंतर जे डॉक्टरांना दिसलं त्यावरून प्राथमिकदृष्टीने ते gbs मुळेच झालं असं दिसतं, तरी ही कन्फर्म करण्यासाठी सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. सोबत असलेल्या लोकांच्या आयसोलेशन बाबतीत पुस्तकात काही सांगितलेले नाही. लवकर ट्रीटमेंट मिळाली नाही तरचं रुग्ण दगवू शकतो, अन्यथा जास्तीत जास्त रुग्णांना काही होतं नाही अशी माहिती डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. दरम्यान, काही त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असल्याचे ठाकूर म्हणाले.


शिळे अन्न, उघड्यावरचे पदार्थ  खाऊ नका


दरम्यान, शिळे अन्न, उघड्यावरचे पदार्थ  खाऊ नका असा सल्ला डॉ. संजीव ठाकूर यांनी दिला आहे. तसेच पोटाचा काही त्रास होतं असेल हातपायातून त्राण गेले असं वाटतं असेल तर डॉक्टरांना दाखवा असेही ते म्हणाले. याला घाबरुन जाण्याचे काहीही गरज नसल्याचे डॉ. संजीव ठाकूर म्हणाले.


महत्वाच्या बातम्या: