Health : चालणे हा एक सर्वांग सुंदर व्यायाम समजला जातो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचं चालणं तितकं होत नाही. बदलती जीवनशैली, कामाचा ताण, प्रवासासाठी वाहन या सर्व गोष्टींमुळे चालणं कमी झालंय. ज्यामुळे अनेकांना विविध आजारांना बळी पडावे लागते. चालण्याचा व्यायाम जितका सोपा आहे, तितकाच तो प्रभावीही आहे. आरोग्य तज्ज्ञ नेहमी लोकांना दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा सल्ला देतात. रोज चालल्यानंतरही तुमचे वजन कमी होत नसेल, तर तुम्ही कोणती चूक करत आहात ते जाणून घ्या, आरोग्य तज्ज्ञ सांगतात...


 


हृदयरोग, कोलेस्ट्रॉल आणि कॅन्सर...


अनेकजण सल्ला देतात की, वजन कमी करायचे असेल तर डायटिंग करा. रोज जिममध्ये जा आणि घाम गाळा. तुम्हीही लोकांना अशा अनेक गोष्टी बोलताना ऐकल्या असतील. पण काही लोकांचे हे सर्व करूनही वजन कमी होत नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांना तीव्र कसरतही कामास येत नाही, अनेकजण चालण्यासारख्या हलक्या आणि साध्या व्यायामाद्वारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चालणे नेहमीच फायदेशीर मानले जाते. या संदर्भात जगभरात बरेच संशोधन झाले आहे, ज्यामध्ये असे समोर आले आहे की, चालणे वजन कमी करण्यात खूप मदत करते. यासोबतच चालण्याने हृदयरोग, कोलेस्ट्रॉल आणि कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. पण चालण्याचा कोणता मार्ग अधिक फायदेशीर आहे?  जाणून घेऊया..


 


चालणे कसे करावे?


आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चालण्याने लवकर वजन कमी करायचे असेल तर रिकाम्या पोटी चाला. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीनुसार, रिकाम्या पोटी चालण्याने शरीरातील चरबी लवकर वितळते. रोज 30 ते 60 मिनिटे काहीही न खाता चालल्याने आतड्यांमध्ये जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. असे चालल्याने चयापचय क्रियाही सुधारते.


 


संशोधन काय म्हणते?


नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, जे लोक रिकाम्या पोटी व्यायाम करतात, जे काही खाल्ल्यानंतर व्यायाम करणाऱ्यांपेक्षा 70 टक्के जास्त फॅट्स बर्न करतात. हे स्पष्ट आहे की, जर तुम्ही काहीही न खाता चाललात तर ते अधिक फायदेशीर ठरेल.


 


जेवल्यानंतरही चालणे शक्य आहे


CDC च्या अहवालानुसार, तुम्ही आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करू शकता. जेवण घेतल्यानंतर तुम्ही तीन वेळा 10 मिनिटे चालणे करू शकता. याचाही मोठा फायदा होईल. यामुळे चयापचय वाढेल आणि ऊर्जा देखील वाढेल. यासोबतच रक्ताभिसरण सुधारते.


 


हेही वाचा>>>


Employee Health : करिअर आहेच, पण रोज 10-12 तास काम करत असाल तर सावधान! हृदयावर होणारा परिणाम जाणून थक्क व्हाल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )