Health: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. कर्करोग, लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेह अशा गंभीर आजारांचा सामना लोकांना करावा लागतोय. त्यापैकी मधुमेहींबाबत बोलायचं झालं तर, या रुग्णांनी आपला आहार आणि खाण्याच्या सवयी योग्य तसेच संतुलित ठेवाव्यात. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर आजारांचा धोकाही वाढतो. हा आजार जीवनशैलीशी संबंधित आहे. रक्तातील शुगर वाढण्याच्या कारणांमध्ये रोजच्या सवयी नीट न पाळणे समाविष्ट आहे. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी स्वामी रामदेवांनी काही खास फॉर्म्युला सांगितला आहे. एकदा पाहाच..


मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही खास उपाय


जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत, रिफाइंड पिठापासून बनवलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करतात, ज्यांचे वजन जास्त असते आणि त्यांना आनुवंशिकता असते, ज्यामध्ये व्यक्तीला त्याच्या कुटुंबांकडून हा आजार होतो. स्वामी रामदेव यांनी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत, ज्यामध्ये तुम्ही जेवणानंतर या पेयांचे सेवन करावे.


जेवल्यानंतर हे ड्रिंक प्या..


स्वामी रामदेव त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करतात आणि लोकांना निरोगी राहण्यासाठी टिप्स देतात. त्यांनी सांगितले की, जेवल्यानंतर पाणी पिणे अजिबात योग्य नाही. पाणी कोणी पिऊ नये. त्याचबरोबर साखरेच्या रुग्णांनी साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही पेयांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.


ही 3 पेय पिणे फायदेशीर आहे


ऍपल सायडर व्हिनेगर - डायबिटीजचे रुग्ण पाण्यात ऍपल सायडर व्हिनेगर मिसळून हे पेय पिऊ शकतात. हिवाळ्यात तुम्ही ते कोमट पाण्यात टाकूनही पिऊ शकता. हे पेय प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.


जांभूळ व्हिनेगर - रामदेव म्हणतात की जांभूळचे फळ, बिया आणि पाने हे सर्व मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. जांभूळचे व्हिनेगर बाजारात सहज उपलब्ध आहे. मधुमेहाचे रुग्ण जेवणानंतर कोमट पाण्यात जांभूळ व्हिनेगर मिसळून पिऊ शकतात.


कोरफडीचा रस - या वनस्पतीचा रस पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. कोरफडीचा रस प्यायल्याने केवळ साखरेची पातळी कमी होण्यास मदत होत नाही तर पोटही डिटॉक्सिफाय होते. तुम्ही सकाळी कोरफडीचा रस देखील पिऊ शकता.


आणखी एक उपाय..


स्वामी रामदेव सांगतात, मधुमेहाचे रुग्ण जेवणानंतर 1 ग्लास ताक देखील पिऊ शकतात. पण हिवाळ्यात दिवसभरात फक्त 1 ग्लास ताक पिणे चांगले. 


हेही वाचा>>>


Weight Loss: 5 महिन्यांत कमी केलं चक्क 33 किलो वजन? नवज्योत सिंह सिद्धूंचं वेट लॉसचं रहस्य 'हे' 5 नियम, अनेकांना माहीत नाही..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )