Health: आपल्या आयुर्वेदात मोठ्यातल्या मोठ्या आजारांवरील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्याचा जर योग्य पद्धतीने अवलंब केला तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. निसर्गाने अशी अनेक फळं सांगितली आहेत, जी विविध आजारांवर रामबाण उपाय ठरत आहेत. पपई हे असं फळ आहे, जे खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात असे आचार्य बाळकृष्ण सांगतात. यामागील काय तथ्य आहे? जाणून घ्या..


 


पपई खाण्याचे अनेक फायदे, आचार्य बाळकृष्ण म्हणतात...


पपई हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पपईच्या फळासोबतच त्याची पाने आणि बियाही अनेक आजारांपासून संरक्षण करतात. तुम्ही पपई कच्ची किंवा शिजवून खाऊ शकता. त्यात फायबर, कॅलरीज, प्रथिने, चरबी, प्रथिने आणि आयोडीन तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक असतात. जे शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आचार्य बाळकृष्ण म्हणतात की, पपई खाल्ल्याने, पचनाचे आजार, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार, प्लेटलेट्स वाढवणे आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला पपई खाण्याचे अनेक फायदे सांगणार आहोत.


 


पचनासाठी फायदेशीर


आचार्य बाळकृष्ण यांच्या मते पपई हे पोट आणि पचनसंस्थेसाठी रामबाण औषध आहे. यामध्ये आढळणारे महत्वाचे पोषक तत्व बद्धकोष्ठता टाळतात आणि मूळव्याधच्या समस्येत आराम देतात. पपईमुळे अन्नही सहज पचते. पपईचा रस पोटातील जंत मारतो. याशिवाय पपई आतड्यांचे गंभीर आजारांपासूनही संरक्षण करते.


 


खनिजे आणि ऊर्जा समृद्ध


आचार्य बाळकृष्ण यांच्या म्हणण्यानुसार, पपईमध्ये इतके पोषक तत्व, जीवनसत्त्वे, प्रथिने, ऊर्जा इत्यादी असतात की ते अनेक रोगांवर फायदेशीर ठरते. पपई कडू, तिखट, कफ आणि वात कमी करते आणि सहज पचते. पपईचे कच्चे फळ किंचित कडू आणि गोड असते. आणि पिकलेले फळ गोड असते. पपईमुळे सूज येण्याचा त्रास कमी होतो, याशिवाय पपई रक्त शुद्ध करते.


 


मांसाहारी पदार्थात घालतात पपई?


पपईमध्ये पपेन नावाचा पदार्थ आढळतो जो मांसाहारी पदार्थ शिजवण्यास मदत करतो. त्यामुळे मटण आणि चिकनच्या जड पदार्थांमध्ये कच्ची पपई घातली जाते, ज्यामुळे ते शिजते आणि पचायलाही हलके जाते


 


 


 


हेही वाचा>>>


Women Health: महिलांनो..तुमच्या 'या' सवयी आताच सोडा! ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतोय, डॉक्टरांनी सांगितले...


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )