Health : गेल्या आठवड्यातच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला कोरोनाची (Corona) लागण झाल्याची बातमी समोर आली, ज्यानंतर त्याने अनंत-राधिका अंबानीच्या लग्नाला जाणं टाळलं होतं. मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिसला होता. यानंतर पुन्हा कोरोना महामारीबाबत चर्चा सुरू झाली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा चिंताजनक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे खिलाडी नंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना देखील आता कोरोनाची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, अमेरिकेत हा आजार झपाट्याने पसरत आहे. ज्याचा फटका अमेरिकेच्या राष्ट्रपतींनाही बसला आहे. यानंतर आता कोरोना महामारी पुन्हा येतेय का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. दरम्यान, अमेरिकेसह जगातील विविध देशांमध्ये रुग्णांची वाढती संख्या कोरोना महामारीच्या दिशेने निर्देश करत असल्याचं दिसत आहे.


 


जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, WHO ची चिंताजनक माहिती 


अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बायडेन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, लास वेगासमधील निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांचे पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी सांगितले की, 81 वर्षीय बायडेन यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. बूस्टर डोसही दिला आहे.


 



  • अमेरिकेत हिवाळ्यापासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

  • ताज्या अहवालानुसार, अमेरिकेतील 7 राज्यांमध्ये प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत.

  • अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

  • कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, मेरीलँड, ओरेगॉन आणि टेक्सासमध्येही संख्या वाढली आहेत.

  • लोकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.


 


कोरोना दर आठवड्याला 1700 लोकांचा बळी घेत आहे : WHO


अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक अलर्ट जारी केला होता की, कोरोना महामारी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. WHO च्या अभ्यासानुसार, सध्या जगभरात कोरोनामुळे दर आठवड्याला 1700 लोकांचा मृत्यू होत आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट उदयास येत आहे. ज्या लोकांना आपल्या उत्तम प्रतिकारशक्तीमुळे कोरोनाचा परिणाम झाला नव्हता, त्यांनाही आता याचा फटका बसू लागला आहे. असं WHO ने म्हटलंय.



नुकतीच अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली होती


काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारलाही नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. याच कारणामुळे तो अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात सहभागी झाला नव्हता. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिसला होता.


 


 


हेही वाचा>>>


Health : काय सांगता! केवळ रक्तदाब, लठ्ठपणामुळेच नाही, तर 'या' कारणांमुळेही येऊ शकतो Heart Attack,हृदयरोग तज्ज्ञ सांगतात..


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.