Health: सध्याची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, व्यायामाचा अभाव यासारख्या अनेक गोष्टींमुळे लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय. अशात मधुमेह हा एक असा गंभीर आजार आहे, जो दोन प्रकारचा आहे, टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह. मधुमेहाच्या आजाराचा आपल्या शरीराच्या अवयवांवर घातक परिणाम होतो. या आजारात रुग्णाला अनेक आजारांनी घेरलंय, त्यामुळे योग्य वेळी उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तो गंभीरही होऊ शकतो. मधुमेहाचा शरीराच्या कोणत्या भागांवर परिणाम होऊ शकतो? 


मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढतायत


बदलत्या काळानुसार आजकाल आपण जे खातो ते अन्न आणि जीवनशैली अशी झाली आहे की, मधुमेहाचे बळी वाढत आहेत. त्यामुळे यामध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण मधुमेहाचा परिणाम शरीराच्या अवयवांवर होतो. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार हेल्थ एक्सपर्ट डॉ. बिनाल शाह यांनी यावर महत्त्वाची माहिती शेअर केलीय..जाणून घेऊया..


हृदय


मधुमेहामध्ये, रक्तातील साखरेची पातळी सतत कमी होणे आणि वाढणे हृदयासाठी चांगले नाही. या आजारात ट्रायग्लिसराइड जास्त राहते, त्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल कमी होऊ लागते आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येते आणि रक्तप्रवाहावर परिणाम होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका असतो.


यकृत


मधुमेह होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली, अशा स्थितीत स्नायूंमध्ये असलेली साखर देखील यकृताकडे जाऊ लागते, यामुळे यकृताच्या पेशी हळूहळू खराब होतात आणि अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.


डोळे


टाईप 1 असो वा टाइप 2 डायबिटीज, वेळेवर चेकअप करत राहायला हवे, कारण जर साखरेची पातळी जास्त असेल तर डोळ्यांच्या रेटिनावर सूज येऊ शकते. डोळ्यांच्या रेटिनाच्या रक्तवाहिन्या कमकुवत होतात, ज्याचा रेटिनावर विपरीत परिणाम होतो. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या आणि अंधत्व देखील होऊ शकते.


किडनी


जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा रक्ताभिसरणावरही परिणाम होतो, त्यामुळे अनेक अवयव हळूहळू काम करणे थांबवतात, त्यापैकी एक म्हणजे किडनी. शरीरातील कचरा लघवीद्वारे बाहेर काढणे हे त्याचे कार्य आहे, परंतु जेव्हा किडनी कार्य करू शकत नाही तेव्हा शरीरात विषारी पदार्थ वाढतात आणि मूत्रपिंड काम करणे थांबवतात.


पाय


रक्तातील साखरेमुळे पायावरही मधुमेह होतो, जखमा दिसू लागतात. पायात बधीरपणा, मुंग्या येणे, मंद जखमा भरणे ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात, ज्याला डायबेटिक फूट असेही म्हणतात. वेळीच लक्ष न दिल्यास चालणेही कठीण होते.


हेही वाचा>>>


Health: रोज नाही, पण अधूनमधून मद्यपान करता? वीकेंडला अल्कोहोल सेवन करता? यकृतासाठी कितपत धोकादायक? तज्ज्ञ काय म्हणतात?


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )