chia Seeds: आजकाल लहान वयातही बीपी आणि शुगर होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतय. यासाठी अनेक जण नाना प्रकारचे डायट, प्रोटीन पावडर तसेच रक्तातील साखरेवर नियंत्रण करण्यासाठी शुगर फ्री च्या गोळ्याही वापरतात. पण या घरगुती बियांमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारण्यास मदत होते. यात भरपूर प्रथिने आणि फायबर्सह दुधापेक्षाही अधिक प्रोटीन असल्याचा दावा केला जातो. कोणत्या आहेत या बिया? 


आजकाल कोणत्याही किराणा दुकानात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या चिया सीड्स या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासह निरोगी व शरीराला मुबलक प्रथिने फायबर ओमेगा थ्री, फॅटी ऍसिड सह अनेक पाचक रस देतात. दोन चमचे चिया सीड्समध्ये ग्लासभर दुधापेक्षा अधिक प्रोटीन असल्याचं सांगितलं जातं. अशा प्रकारचे अनेक हेल्थ व्हिडिओज, रिल्स समाज माध्यमांवरही व्हायरल होताना दिसतात. 


कोणत्या प्रकारे खाता येतील चिया सिड्स?


लहान लहान काळ्या रंगाच्या चिया सीड चा पोत गुळगुळीत आणि चमकदार आहे. त्याचा रंग पांढरा तपकिरी किंवा काळाही असू शकतो. अत्यंत अष्टपैलू समजल्या जाणाऱ्या बिया अनेक जण पाण्यात भिजवून किंवा दलिया मध्ये,सांजा बनवताना तसेच भाजलेल्या वस्तूंमध्ये वापरता येतो. अनेक जण याचा स्मुदी बनवताना तसेच सॅलड बनवतानाही वापर करताना दिसतात.


दुधापेक्षा अधिक कॅल्शियम पालकापेक्षा अधिक आयर्न


चिया सीड्समध्ये दुधापेक्षा दहा ग्रॅम अधिक कॅल्शियम, पालकापेक्षा अधिक आयर्न, तसेच मुबलक प्रमाणात ओमेगा , फायबर आणि प्रोटीन्स आहेत.


 


वजन कमी करण्यास चिया सीड्स उपयुक्त


दोन चमचे चिया सीड्स च्या सेवनाने शरीरातील अनेक आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होत असल्याचा तज्ञ सांगतात. बहुगुणी असणाऱ्या चिया सीड्स दररोज दोन चमचे खाल्ला ना वजनावर नियंत्रण मिळवणं सोपं जात असल्यास सांगितलं जातं. त्वचेसाठी ही या बिया खाण्याचा सल्ला देण्यात येतो. चिया बियांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. फायबरमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्याचा अनुभव येतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.


ओमेगा-३ आणि वनस्पती प्रथिनेही अधिक


ओमेगा-३ फॅटी ॲसिड:- चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे तुमच्या हृदयासाठी चांगले असते. वनस्पती प्रथिने:- चिया बिया वनस्पती-आधारित प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, जो स्नायूंच्या आरोग्यासाठी, जखमेच्या उपचारांसाठी आणि रोग प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे.


हेही वाचा: